advertisement

Palghar: 4 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं, दुचाकी घसरली अन् साईनाथच्या अंगावर ट्रकचं चाक गेलं, मन विचलित करणारा VIDEO

Last Updated:

अचानक या तरुणाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं. दुचाकी स्लिप झाली. त्यामुळे दोघेही खाली पडले. पण, तितक्यात समोरून एक भरधाव ट्रक आला.

News18
News18
राहुल पाटील, प्रतिनिधी
पालघर: पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाडा इथं बाजारपेठेत एका भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला आहे. दुचाकी स्लिप झाल्यानंतर  समोरून येणाऱ्या ट्रेलरच्या चाकाखाली तरुण सापडला. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  पालघर जिल्ह्यातील वाडा येथील बाजारपेठेत २२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वाडाच्या बाजारपेठेत सकाळी नेहमी सारखी वर्दळ होती. यावेळी एका दुचाकीवरून दोन तरुण वेगात जात होते.
advertisement
पण, अचानक या तरुणाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं. दुचाकी स्लिप झाली. त्यामुळे दोघेही खाली पडले. पण, तितक्यात समोरून एक भरधाव ट्रक आला. ट्रकला पाहून दोघांना सावरण्याचा प्रयत्न केला, पण, समोरील चाकाला दुचाकीवर मागे बसलेल्या साईनाथ सालकर धडकला. ट्रक वेगात असल्यामुळे काही कळण्याच आत साईनाथ हा ट्रकच्या पहिल्या चाकाला धडकून मागील चाकाखाली आला. ट्रक वेगात असल्यामुळे अवघ्या ३ सेकंदात हा प्रकार घडला.
advertisement
ट्रकच्या मागील चाकाखाली खाली आल्याामुळे अपघातात गावात राहणारा साईनाथ सालकर हा गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी धाव घेतली. दोघांनी ताताडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.  जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू  आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Palghar: 4 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं, दुचाकी घसरली अन् साईनाथच्या अंगावर ट्रकचं चाक गेलं, मन विचलित करणारा VIDEO
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement