Central Railway: तासाभराचा प्रवास आता दीड तासांवर, कल्याण-डोंबिवलीकरांचे प्रचंड हाल, मध्य रेल्वेला झालंय काय?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
गेल्या 15 ते 20 दिवसांपासून मध्य रेल्वेवरील लोकल दुपारच्या वेळी सातत्याने उशिरा धावत आहेत. यामुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. सतत उशीरा धावणाऱ्या लोकलबद्दल मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून मध्य रेल्वेवरील लोकल सातत्याने उशिरा धावत आहेत. यामुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. कर्जत- कसाऱ्याहून सीएसएमटीकडे धावणाऱ्या ह्या लोकलचा खेळ खंडोबा होताना पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांचे चांगलेच मेगाहाल होत आहेत. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. दुपारच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी तब्बल अर्धा ते एक तास लोकल उशिराने धावत आहे. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होताना दिसत आहे. विशेषत: दुपारच्या वेळी नोकरीसाठी जाणाऱ्या नोकरदारांना ऑफिसला जाताना त्रास सहन करावा लागत आहे.
सीएसएमटी स्थानकावर लोकल तब्बल एक तास उशिराने पोहोचते. यामुळे प्रवाशांचे मेगाहाल होत आहेत. दुपारच्या वेळेमध्ये ऑफिस गाठणाऱ्या नोकरदारांचे चांगलेच हाल होत आहेत. खोपोली, कर्जत आणि कसाऱ्याहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फारच त्रास सहन करावा होत आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून मध्य रेल्वेचा कोणत्या कारणामुळे खोळंबा होत आहे, याबद्दल मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला स्पष्टीकरण दिलं आहे, ते म्हणाले की, "दुपारच्या वेळेमध्ये मध्य रेल्वेकडून 15 डब्ब्यांच्या लोकलसाठी सध्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मार्च 2026 पर्यंतची आम्ही त्या कामासाठी डेडलाईन समोर ठेवली आहे. त्यामुळे सध्या काही लोकल्सना उशीर होत आहे."
advertisement
मुख्य जनसंपर्क अधिकारी पुढे म्हणाले की, "सध्या उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आहे. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर धुकं आहे. म्हणून मोठ्या प्रमाणावर उशीराने एक्सप्रेस धावत आहे. त्या उशीरा आल्यामुळे इतर लोकल्सचा खोळंबा होत आहे. कुर्ला ते मुंबई सीएसएमटी या स्थानकादरम्यान चार मार्गिका आहेत. त्यामुळे पुढे जाण्यासाठी लोकल्स आणि एक्सप्रेसला काही प्रमाणात उशीर होतो. 15 डब्बा लोकलसाठी प्लॅटफॉर्मच्या रूंदी वाढवली जात आहे. यामुळे दुपारच्या वेळेमधील लोकलला उशीर होण्याची शक्यता आहे."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 6:36 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway: तासाभराचा प्रवास आता दीड तासांवर, कल्याण-डोंबिवलीकरांचे प्रचंड हाल, मध्य रेल्वेला झालंय काय?









