पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील सुपे पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. काळखैरेवाडी गावाच्या हद्दीत खैरेपडळ इथं सुपा शेरेवाडीच्या रोडलगत परिसरात एका २५ ते २७ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. माळरानावर एका महिलेचा अर्ध नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच सुपे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदरचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी पाठवला. खून झालेली बातमी परिसरात कळताच एकच खळबळ उडून गेली.
advertisement
घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. या संदर्भात प्राथमिक दृष्या पाहिलं असलं गळा दाबून महिलेला जीवे ठार मारलं आहे, असं अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या महिलेवर अत्याचार करून खून केला असावा, असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला.
बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी या प्रकरणी सांगितलं की, काळखैरेवाडी गावाच्या हद्दीत खैरेपडळ इथं सुपा शेरेवाडीच्या रोडलगत परिसरात एका २५ ते २७ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. या संदर्भात प्राथमिक दृष्या पाहिलं असता महिलेवर हल्ला करून जीवे ठार मारलं आहे. तसंच, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सदर मुलीवर किंवा महिलेवर अत्याचार झाला आहे का हे कळू शकेल, असंही स्पष्ट केलं.
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी सुपा पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी श्वान पथक, वैद्यकीय तपास पथकाने पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. गुन्ह्याचा उकल करण्यासाठी पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुपा पोलीस करत आहे.
शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांकडे सादर
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये होऊन झालेल्या महिलेचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. येथील डॉक्टर अमोल शिंदे यांना संपर्क साधला असता. मृत्यू कशामुळे झाला आहे हे त्यांनी सांगितलं नसून सदरचा अहवाल आम्ही पोलिसांना दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, मृत महिला कोण आणि कुठली आहे, आणि आरोपी कोण आहे, याचा तपास पोलीस करत आहे.
