TRENDING:

घोषणा करायला त्यांच्या बापाचं काय जातंय! फडणवीसांनी अजितदादांच्या आश्वासनांची हवाच काढली

Last Updated:

पुण्यातील मुलाखतीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांकडून मतदारांना मोठमोठी आश्वासनं दिली जात आहेत. महापालिकेवर सत्ता आल्यास पुणेकरांना मेट्रो मोफत करणार अशी भलीमोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यामुळे, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आज पुण्यातील मुलाखतीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. किमान लोकांचा विश्वास बसेल अशा गोष्टी बोलाव्यात, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावली आहे.
News18
News18
advertisement

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार फक्त बोलतात. माझं काम बोलतं. मी आत्तापर्यंत संयम पाळला त्यांचा संयम ढासळला आहे. १५ तारखेनंतर अजित दादा नाही बोलणार देवेंद्र फडणवीस बोलणार आहे. कुठलाही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद आहे. राज ठाकरे यांनी मला क्रेडिट दिलं त्यांचं मी आभार मानतो, त्यांचा मला आशीर्वाद मिळेल.

advertisement

घोषणा करायला आपल्या बापाचं काय जाते: देवेंद्र फडणवीस

घोषणाबाजीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यातून जेवढी उडणारे विमान आहेत ते मोफत देऊ महिलांना, घोषणा करायला आपल्या बापाचं काय जाते. जिंकून येणार नसेल तर काही ही जाहीरनामा करतात. किमान विश्वास बसेल असं तरी सांगा... पुणेकरांना रिलायबल सेवा हवी आहेत . पुणेकरांनी पी एम पी एल मोफत मिळणार नाही हे माहिती आहे कारण पुणेकरांना माहिती आहे की ते (राष्ट्रवादी) जिंकून येणार नाहीत.

advertisement

गुन्हेगारांवर फडणवीस काय म्हणाले? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, रविवारी शेवगा आणि गुळाला किती मिळाला दर?
सर्व पहा

पुण्यात गुन्हेगारांना उमेदवारी दिली त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुन्हेगारांना उमेदवारी देण्याची गरज काय? ६० लाख पुणेकर आहेत. कोयता गँग संपवा, "पोलिस आयुक्त तुमच्यावर कारवाई करेल असं बोलणारे तेच लोकं गुन्हेगारांना तिकीट द्यायची आणि त्यांच्या समर्थनार्थ बोलायचं. गुन्हेगार निवडून आले तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल जेल असेल. मातोश्रीची दारं माझ्यासाठी बंद झाली होती तिथे जाऊन मी ते उघडण्याचा प्रयत्न केला. मी मातोश्रीवर कधीच टीका नाही केली माझ्याकरिता जनतेच्या हृदयातील दारे उघडली आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
घोषणा करायला त्यांच्या बापाचं काय जातंय! फडणवीसांनी अजितदादांच्या आश्वासनांची हवाच काढली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल