काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी ऑपरेशन अलख निरंजन अंतर्गत आयटी नगरी हिंजवडी आणि इतर परिसरात छापा टाकून कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त केलं होते तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्येच बंदी असलेला चायनीज मांजाची राजरोसपणे विक्री होत असल्याची बाब समोर आली आहे.
रेंटने फ्लॅट घेऊन पिकवला गांजा
पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात असलेल्या एका दाट वस्तीच्या भागात फ्लॅट भाड्याने घेऊन तिथं गांजा पिकवला जात होता. हायड्रोफोनिक अर्थात विना मातीची गांजाची शेती केली जात होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात सर्रासपणे जीवघेणा चायनीज मांजा, नायलॉन मांजा हा विकला जात आहे. हा मांजा काच आणि प्लॉस्टिकचा वापर करून बनवलेला असल्यानं तो तुटत नाही. पतंगबाजीच्या खेळात कटलेल्या पतंगाचा मांजा रस्त्यावर पसरतो आणि दुचाकीस्वारांचे गळे कापले जाणे, पक्ष्यांचे पंख छाटले जाणे आणि गंभीर अपघात झाल्याच्या घटना याआधी देखील समोर आल्या आहेत.
advertisement
चायनीज मांजावर कारवाई कधी होणार?
ज्याप्रमाणे हायड्रोफोनिक गांजा तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे, त्याचप्रमाणे हा मांजा रस्त्यावरून चालणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या जिवावर उठला असल्याने पुणे पोलीस ज्याप्रमाणे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे चायनीज मांजा विकणाऱ्यांविरुद्ध पिंपरी चिंचवड पोलिस काही कठोर कारवाई करते का की लोकांचे गळे कापले जाण्याची वाट बघते याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
