TRENDING:

Pune : रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची घेतली भेट; चर्चेला उधाण

Last Updated:

पुण्यात आज कालवा समितीच्या बैठकीसाठी शरद पवार गटातले अनेक आमदार, खासदार हजर होते. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रकांत फुंदे, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात सकाळी सात वाजल्यापासून बैठका घेत आहेत. विविध प्रश्नांवर नियोजीत बैठका सुरू असून या बैठकांमध्ये अजित पवार यांची रोहित पवार, राजेश टोपे आणि सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. रोहित पवार हे सर्किट हाऊसला गेले होते. या भेटीत अनेक मुद्द्यांची चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह तुतारीचे अनावरण रायगडवर होणार आहे. त्याआधी ही भेट झालीय. अजित पवार सकाळी सातच्या सुमारास सर्किट हाउसला आले. तिथं अचानक रोहित पवार आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. रोहित पवार हे त्यांच्या मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने भेटीला आल्याचं सांगण्यात आलंय.
News18
News18
advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये ते भेटले. या भेटीचा अधिक तपशील समोर येऊ शकलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाले. तर शरद पवार यांच्या पक्षाला नवं नाव आणि चिन्ह मिळालं. या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. दरम्यान, सर्किट हाऊसला शरद पवार यांच्या गटातल्या नेत्यांनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

advertisement

खासदार सुप्रिया सुळे, आमदार राजेश टोपे, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी सर्किट हाऊसवर विविध कामानिमित्त बैठक घेतली. पुण्यात आज कालवा समितीच्या बैठकीसाठी शरद पवार गटातले अनेक आमदार, खासदार हजर होते. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या भेटीबाबत सांगताना म्हटलं की, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, गुरांचं पाणी आणि छावण्या याचा विचार गांभीर्याने करावा एवढीच विनंती करायला मी आले होते. अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत. ते वेगळ्या विचाराच्या सरकारमध्ये काम करत असले तरी लोकांच्या कामासाठी लोकप्रतिनिधी म्हणून भेट घेण्यात काही वावगं नाही.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune : रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची घेतली भेट; चर्चेला उधाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल