ही गोळीबाराची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं पुणे हादरलं आहे. मध्यरात्री पुण्याच्या कोथरूड भागात गोळीबार झाला आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीकडून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री कोथरुड भागातून जात असताना गाडीला पुढे जाण्यास साईड न दिल्याच्या कारणातून हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जातंय.
advertisement
मुसा शेख, रोहित आखाड आणि मयूर कुंभारे अशी गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींची नावं आहेत. तिघेही बुधवारी रात्री कोथरुड परिसरातून जात होते. यावेळी एका वाहनचालकाने घायवळ टोळीच्या गुंडाना पुढे जाण्यास साईड दिली नाही. याच कारणातून हे तिघे संतापले आणि त्यांनी कारमधील प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला. सुरुवातील तीन राऊंड फायर केल्याची माहिती मिळत होती. मात्र आता रात्री एकच राऊड फायरिंग केल्याचं सांगितलं जातंय. ही घटना कोथरूडच्या शिंदे चाळ परिसरात घडली.
या गोळीबारात प्रकाश घुमाळ जखमी झाले असून, त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. जखमीवर पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची आता प्रकृती कशी आहे, याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र एकीकडे आंदेकर टोळीने केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता घायवळ टोळीने गोळीबार केल्याने पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.