TRENDING:

GBS Outbreak Pune : पुण्यात जीबीएसचं थैमान थांबेना, मृतांची संख्येत वाढ, 20 जण व्हेंटिलेटरवर, पुणेकरांना वाढला धोका?

Last Updated:

पुण्यात जीबीएसचं थैमान थांबता थांबत नाही आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत चालली आहे. गूरूवारी तीन जीबीएस रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जीबीएस बाधित रूग्णसंख्या आता 130 वर पोहोचली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Guillain Barre Syndrome : पुण्यात जीबीएसचं थैमान थांबता थांबत नाही आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत चालली आहे. गूरूवारी तीन जीबीएस रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जीबीएस बाधित रूग्णसंख्या आता 130 वर पोहोचली आहे. यापैकी 20 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तर आतापर्यंत या आजारामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात आरोग्य यंत्रणा उपाययोजना करते आहे. मात्र तरी देखील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
GBS Outbreak Pune
GBS Outbreak Pune
advertisement

जीबीएस रूग्णांचा आकडा 130 वर

पुणे जिल्ह्यातील या 130 रूग्णांपैकी 25 रूग्ण हे पुणे महापालिका हद्दीतील आहेत. 74 रूग्ण महापालिका समाविष्ट गावातील आहेत. 13 रूग्ण पिपंरी चिंचवड महापालिकेत,ग्रामीणमध्ये 9 तर इतर जिल्हयातही 9 रूग्णांचा समावेश आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा सर्वाधित प्रादुर्भाव पुणे महापालिकेच्या हद्दीतील धायरी, नांदेड गाव, किरकटवाडी या भागांमध्ये झाला आहे. या भागातील अनेक जलवाहिन्या या ड्रेनेजलाईनमधून गेल्याची माहिती आहे. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून खराब जलवाहिन्या बदलणे आणि दुरूस्तीची कामे हाती घेतली आहे.

advertisement

पुण्यात जीबीएसचा तिसरा बळी

पुण्यात याआधी जीबीएसमुळे दोघांचा बळी गेला होता. आता पिंपरीत ३६ वर्षीय युवकाचा मृ्त्यू झाला आहे. पिंपळेगुरव परिसरात वास्तव्यास असलेल्या ३६ वर्षीय युवकाला २१ जानेवारी रोजी गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. या रुग्णावर महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. या रूग्णाला गुईलेन बॅरे सिंड्रोम नंतर न्यूमोनियाचीही लागण झाली होती. उपचारादरम्यान ३० जानेवारी रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

advertisement

हॉस्पिटलमध्ये विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

दरम्यान, गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. पुणे शहरांतील रुग्णांवर उपचारासाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात उपचार करण्याची सूचना करण्यात आली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
GBS Outbreak Pune : पुण्यात जीबीएसचं थैमान थांबेना, मृतांची संख्येत वाढ, 20 जण व्हेंटिलेटरवर, पुणेकरांना वाढला धोका?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल