TRENDING:

Shiv Jayanti 2026: दांडपट्टा ते वाघनख, शिवकालीन दुर्मिळ ठेवा पाहिला का? पुण्यात भरलंय भव्य प्रदर्शन, Video

Last Updated:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे 250 ते 300 वर्षे जुनी दुर्मिळ आणि अस्सल शस्त्रे पाहण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. सर्वांसाठी मोफत खुले असलेले हे प्रदर्शन इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : शिवजयंतीच्या औचित्य साधून छत्रपती शिवाजीनगर परिसरातील संतोषी माता मंदिर प्रांगणात भव्य शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. साखर संकुलाजवळ भरविण्यात आलेल्या या विशेष प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे 250 ते 300 वर्षे जुनी दुर्मिळ आणि अस्सल शस्त्रे पाहण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. सर्वांसाठी मोफत खुले असलेले हे प्रदर्शन इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
advertisement

या प्रदर्शनात तलवारी, दांडपट्टा, बिचवा, वाघनख, खंजीर, राजस्थानी तलवारी, मराठा तलवार तसेच मुघलकालीन शस्त्रे अशा विविध ऐतिहासिक वस्तूंचा समावेश आहे. सुमारे 150 ते 200 अस्सल शस्त्रे नागरिकांसमोर मांडण्यात आली असून प्रत्येक शस्त्राची माहिती देखील देण्यात येत आहे. या माध्यमातून नव्या पिढीला शिवकालीन इतिहासाची ओळख करून देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे.

advertisement

Shivjayanti: छ. शिवरायांचं मूळ गाव; वेरुळच्या गढीचा इतिहास! Video

प्रदर्शनाचे आयोजक राहुल भोसले यांनी सांगितले की, आजची पिढी डिजिटल युगाकडे झुकत असताना त्यांना आपल्या वैभवशाली इतिहासाची जाणीव होणे गरजेचे आहे. शिवजयंती निमित्ताने केवळ डीजे आणि मिरवणुका यावर भर न देता इतिहासाचे प्रबोधन व्हावे, हा आमचा उद्देश आहे. यापूर्वी आम्ही मिरवणुकांमध्ये सहभागी होत होतो. मात्र आता त्याऐवजी अशा विधायक उपक्रमांद्वारे मुलांपर्यंत महाराजांचा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

advertisement

शस्त्रसंग्राहक समाधान सोनाळकर यांनी सांगितले की, गेल्या 25 वर्षांपासून मी शिवकालीन आणि मुघलकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करत आहे. विविध ठिकाणांहून ही शस्त्रे जमा केली असून त्यामध्ये 250 ते 300 वर्षे जुनी अस्सल शस्त्रे आहेत. दांडपट्टे, मराठा आणि मुघल तलवारी, वाघनख, खंजीर यांसारख्या ऐतिहासिक वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक शस्त्राच्या मागील इतिहासाची माहिती देऊन पाहुण्यांना त्या काळातील युद्धतंत्र आणि शौर्यपरंपरेची झलक दाखवली जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दांडपट्टा ते वाघनख, शिवकालीन दुर्मिळ ठेवा पाहिला का? पुण्यात भरलंय भव्य प्रदर्शन
सर्व पहा

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेले हे प्रदर्शन नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत असून विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. परंपरेचा अभिमान जागवणारे आणि इतिहासाची जाणीव करून देणारे हे प्रदर्शन शिवभक्तांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Shiv Jayanti 2026: दांडपट्टा ते वाघनख, शिवकालीन दुर्मिळ ठेवा पाहिला का? पुण्यात भरलंय भव्य प्रदर्शन, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल