TRENDING:

Junnar MLA Atul Benke : राष्ट्रवादीचे तटस्थ आमदार अतुल बेनके यांनी अखेर पत्ता उघडला; दादा की साहेब? कुणाला दिली साथ

Last Updated:

Junnar MLA Atul Benke : सत्ता संघर्षानंतर तटस्थ असलेले जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, (रायचंद शिंदे, प्रतिनिधी) : अजित पवार यांनी बंडखोरी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. यावेळी बहुतांश आमदार सत्ताधारी अजितदादा गटाला जावून मिळाले. तर काही निष्ठावान म्हणून शरद पवार यांच्यासोबत राहिले. यातही दोघांनाही राग नको म्हणून काही आमदारांनी त्यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. यात जुन्नरचे आमदार अतुल बेनके आघाडीवर होते. अखेर आमदार अतुल बेनके यांनीही आपला पत्ता खोलला असून कोणासोबत जाणार हा निर्णय जाहीर केला आहे.
आमदार अतुल बेनके
आमदार अतुल बेनके
advertisement

अतुल बेनकेही अजितदादा गटात दाखल

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या कार्यकारणीच्या नियुक्तीपत्र अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके उपस्थित होते. दरम्यान अजित पवार गटाची जुन्नर कार्यकारणी जाहिर होत असताना आजपर्यंत तटस्थ असलेले आमदार बेनके यांचा सक्रिय सहभाग दिसतोय. त्यामुळे शेतकरी मेळाव्यातुन अतुल बेनकेंची अजित पवारांना साथ लाभल्याचे दिसुन येत आहे.

advertisement

सत्ता संघर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहिलाच जुन्नर विधानसभेचा दौरा आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत तटस्थ राहिलेले आमदार अतुल बेनके यांनीच हा दौरा आखला आहे. यानिमित्ताने मतदारसंघात झळकलेल्या फ्लेक्सवर शरद पवारांना स्थान नाही. शरद पवारांनी जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा घेऊन दोन आठवडेही उलटले नाहीत तर लगेच बेनके यांनी अजित पवारांच्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलं आहे. यावरून बेनके आता अजित पवार यांच्या गोटात दाखल झाल्याचे संकेत मिळत आहेत. आजच्या शेतकरी मेळाव्यात बेनके यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. तसं स्वतः बेनके यांनी सांगितलं आहे.

advertisement

वाचा - जरांगे पाटलांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली, 'हा' दिला पर्याय

काय म्हणाले अतुल बेनके?

जुन्नर तालुक्यातील अनेक प्रश्न आणि कामे अजित पवार यांनी मार्गी लावली आहेत. मागील अनेक दिवस मी साहेब किंवा दादांच्या गटात नव्हतो. मी कोणतीही भूमिका घेतली नाही. जसे शरद पवार शेतकऱ्यांचे नेते तसे अजित पवार पण आमच्यासाठी आश्वासक नेते असल्याचे बेनके म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Junnar MLA Atul Benke : राष्ट्रवादीचे तटस्थ आमदार अतुल बेनके यांनी अखेर पत्ता उघडला; दादा की साहेब? कुणाला दिली साथ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल