डॉ. प्रभातचंद्र यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून धरणांचे मूल्यांकन, संरचनात्मक तपासणी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जिओ-फेन्सिंगसह हायड्रोलिक तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. या माध्यमातून देशातील जलविद्युत प्रकल्पांची सध्याची स्थिती आणि क्षमता तपासली जाते, भू-भौतिकीय तसेच संरचनात्मक तपासणी केली जाते तसेच भूकंपीय मापदंडांचे मूल्यमापन केले जाते.
advertisement
याशिवाय धरणांची अभियांत्रिकी मूल्यांकन चाचण्या, नवीन संशोधनात्मक चाचण्या, काँक्रिट आणि दगडी बांधांसाठी योग्य दुरुस्ती, धरणफुटीची कारणे शोधणे आणि शास्त्रीय दृष्ट्या पुनर्बाधणीसाठी उपाययोजना केली जात आहेत. हे सर्व उपाय धरणांच्या आयुष्याच्या वाढीसाठी आणि अपघात टाळण्यासाठी महत्त्वाचे आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, धरणांची संरचना अधिक स्थिर केली जात आहे आणि संभाव्य धोके ओळखून त्यांना तातडीने दुरुस्त केले जात आहे.
डॉ. प्रभातचंद्र यांनी असेही स्पष्ट केले की, हायड्रोलिक तंत्रज्ञान आणि AI यांचा वापर केल्याने जलशक्ती प्रकल्पांचे निरीक्षण, संभाव्य समस्या आणि जोखीम यांचा पूर्वसूचना मिळते. त्यामुळे धरणांचे दीर्घकालीन संरक्षण होऊ शकते आणि स्थानिक लोकांचे जीवन सुरक्षित राहते. भविष्यातील हवामान बदल आणि वाढत्या पावसामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वपूर्ण ठरत आहे.