प्रवासाचा वेळ निम्म्यावर
नव्या नियोजनानुसार, मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या ४८ मिनिटांत कापले जाणार आहे. सध्या या प्रवासाला ३ ते ४ तास लागतात. तसेच, पुणे ते हैदराबाद हे अंतर केवळ २ तासांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी ३००० कोटींचे अनुदान आणि २३८ नवीन स्वयंचलित दरवाजांच्या गाड्यांची निर्मितीही वेगाने सुरू आहे.
advertisement
नागपूर-मुंबई मार्गाचे काय?
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, ताज्या घोषणेत पुणे-मुंबई आणि पुणे-हैदराबाद मार्गांना झुकते माप मिळाल्याने विदर्भातील प्रवाशांकडून 'नागपूर-मुंबई मार्गाचं काय झालं?' असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. समृद्धी महामार्गापाठोपाठ या बुलेट ट्रेनची प्रतीक्षा आता अधिक वाढली आहे.
देशातील पहिल्या समुद्राखालील २१ किमी लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू असून, १७ नद्यांवरील पुलांचे कामही प्रगतीपथावर आहे. ७ पैकी ५ किमी बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, लवकरच भारतीय रेल्वेचे रूप पालटलेले दिसेल.
