पोस्ट खात्याच्या नव्या निर्णयानुसार नोंदणीकृत पोस्टच्या वितरणासाठी आता हवाई मार्गाचा वापर केला जाणार आहे. यापूर्वी बहुतेक वेळा पत्रे आणि पार्सल रस्तेमार्गे पाठवले जात असे, ज्यामुळे वितरणात थोडा विलंब होण्याची शक्यता होती. हवाई वाहतुकीमुळे आता वितरणाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे आणि सेवा आणखी वेगवान होईल.
नोंदणीकृत पोस्टच्या या सुधारीत व्यवस्थेमुळे सुरक्षिततेवरही भर देण्यात आला आहे. स्पीड पोस्टमध्ये पत्र किंवा पार्सल कोणालाही दिले जाऊ शकते, तर नोंदणीकृत पोस्टमध्ये पार्सल किंवा पत्र फक्त नोंदीतील व्यक्तीला दिले जाते. प्रेषकाची खात्री करण्यासाठी स्वाक्षरी घेतली जाते आणि पावती दिली जाते. ही प्रक्रिया नोंदणीकृत पोस्टला अधिक सुरक्षित बनवते, विशेषतहा संवेदनशील दस्तऐवज किंवा महत्वाची पत्रव्यवहारासाठी.
advertisement
ग्राहकांना आता दोन प्रकारच्या वितरणाच्या सुविधा उपलब्ध राहतील.
सामान्य वितरण (General Delivery) : पत्र किंवा पार्सल पत्त्यावर कोणालाही स्वीकारण्याची परवानगी, जिथे प्रेषकाला फक्त वितरणाची सामान्य पावती मिळते.
पत्ता-विशिष्ट वितरण (Address-Specific Delivery) : फक्त नोंदीतील व्यक्तीला पत्र किंवा पार्सल दिले जाईल, स्वाक्षरी घेऊन पावती तयार केली जाईल. ही सुविधा दस्तऐवजाच्या संवेदनशीलतेनुसार वापरण्यास अधिक सोपी आणि लवचिक ठरेल.
नवीन प्रणालीमध्ये ग्राहकांना पावतीसाठी फक्त 10 रुपये फी भरणे आवश्यक राहणार आहे. पोस्ट खात्याने आश्वासन दिले आहे की या सुधारित पद्धतीमुळे नोंदणीकृत पोस्ट सेवा अधिक वेगवान, विश्वासार्ह आणि सुरक्षित बनेल, तसेच नागरिकांना पारदर्शक सेवा अनुभवता येईल.