TRENDING:

Pune: पुण्याच्या राजकारणातली मोठी बातमी, रोहित पवार-अमोल कोल्हे अजितदादांच्या भेटीला!

Last Updated:

त्याआधी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांच्यात चर्चा झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी चिंचवड : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. युती आणि आघाडीसाठी जोर बैठका सुरू आहे. अशातच पुण्यात  दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी बैठक पार पडली. आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात अजित पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहे. या भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, चर्चांना उधाण आलं आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात अजित पवारांच्या जिजाई या निवास्थानी जाऊन भेट घेतली.  तिन्ही नेत्यांमध्ये 20  ते 25 मिनिटांपासून दोघांमध्ये सुरू आहे.

तर त्याआधी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांच्यात चर्चा झाली. एक तास झालेल्या बैठकीत जागा वाटपावर बरीच घासाघीस झाली. अजित पवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या जागी शरद पवारांच्या इच्छुकांनी ही दावा केलाय. या ठिकाणी नेमके कोणाचे उमेदवार द्यायचे तसंच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घ्यायचं का? यावर बरीच खलबते रंगली.  या बैठकीनंतर अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी नो कमेंट्स म्हणत थेट पुणे गाठलं. आता पुण्यात हे दोघे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे, अशी अजित पवार गटाकडून बैठकीत उपस्थित असलेल्या अजित गव्हाणेंनी माहिती दिली.

advertisement

अमोल कोल्हेंची सुचक प्रतिक्रिया

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंब आणखी महागले, शेवगा आणि गुळाची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

काही नाही, आम्ही जुने मित्र आहोत. फक्त चहापिण्यासाठी आलो होतो. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. वेट अँड वॉच, अशी सूचक प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.

मराठी बातम्या/पुणे/
Pune: पुण्याच्या राजकारणातली मोठी बातमी, रोहित पवार-अमोल कोल्हे अजितदादांच्या भेटीला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल