TRENDING:

11 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह बॅगेत भरून विहिरीत फेकला; पुण्यात आईचंच क्रूर कृत्य, त्या एका फोटोमुळे महिन्याभरानं उलगडा, पतीही हादरला

Last Updated:

पूजाने दुसऱ्या एका व्यक्तीशी तिसरे लग्न केले आणि त्या लग्नाचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा फोटो पती रवींद्र यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुलाबद्दल विचारणा केली, पण पूजाने उडवाउडवीची उत्तरे दिली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. यात आईनेच केवळ 11 महिन्यांच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. या निर्दयी मातेला रांजणगाव पोलिसांनी अटक केली आहे. पूजा रवींद्र पवार (वय २२, रा. भांबार्डे, ता. शिरूर) असे या आरोपी महिलेचे नाव आहे. तिच्या या कृत्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. मुलगा सतत रडत असल्याने आणि भावी आयुष्यात पुन्हा दुसऱ्यासोबत लग्न करताना येणारा अडथळा दूर करण्यासाठी तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
आईनेच केली 11 महिन्यांच्या बाळाची हत्या (प्रतिकात्मक फोटो)
आईनेच केली 11 महिन्यांच्या बाळाची हत्या (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

पूजा पवार ही ८ मार्च रोजी आपल्या ११ महिन्यांच्या मुलगा 'यश' याच्यासह घरातून निघून गेली होती. तिचे पती रवींद्र पवार यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. दरम्यान, पूजाने दुसऱ्या एका व्यक्तीशी तिसरे लग्न केले आणि त्या लग्नाचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा फोटो पती रवींद्र यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुलाबद्दल विचारणा केली, पण पूजाने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे संशय बळावल्याने रवींद्र यांनी ५ एप्रिल रोजी पोलिसांत धाव घेतली.

advertisement

असा उघड झाला गुन्हा

पोलिसांनी पूजाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, सुरुवातीला तिने मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. "मुलगा सतत रडतो आणि मला पुढील आयुष्यात लग्न करायचे असल्याने तो अडथळा ठरू शकतो," या विचारातून तिने मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मुलाचा मृतदेह एका बॅगेत भरून विहिरीत फेकून दिला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

या भीषण गुन्ह्याचा छडा लावल्यानंतर पोलिसांनी विहिरीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. एका आईनेच आपल्या मुलाचा अशा प्रकारे बळी घेतल्याने संपूर्ण शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
11 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह बॅगेत भरून विहिरीत फेकला; पुण्यात आईचंच क्रूर कृत्य, त्या एका फोटोमुळे महिन्याभरानं उलगडा, पतीही हादरला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल