TRENDING:

Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर स्फोटक परिस्थिती, वाहतूक ठप्प, 'त्या' टँकरचा VIDEO समोर

Last Updated:

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ संध्याकाळी सव्वा वाजेच्याा सुमारास टँकर पलटी झाला. याा टँकरमध्ये प्रोपोलिन गॅस असून तो लिक झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अनिस शेख, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे : मुंबई आणि पुणे शहराला जोडणाऱ्या  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातामुळे किंवा सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी नवीन नाही. पण, आज आडोशी बोगद्याजवळ एका टँकरमुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.  आडोशी बोगद्याजवळ दुपारी एक टँकर पलटी झाला. टँकरमध्ये गॅस लिक झाल्यामुळे  तातडीने मुंबई -पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक थांबवण्यात आली. दुपारपासून वाहतूक थांबवण्यात आली ती संध्याकाळपर्यंत कायम होती. त्यामुळे मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहे.

advertisement

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ संध्याकाळी सव्वा वाजेच्याा सुमारास टँकर पलटी झाला. याा टँकरमध्ये प्रोपोलिन गॅस असून तो लिक झाला. गॅस लिक होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रोपोलिन गॅस हा अत्यंत ज्वलनशील आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून  मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आलेली होती.

advertisement

पण,  मुंबई पुणे एक्स्प्रेसवर खंडाळा आडोशी बोगदा मुंबईकडे जाणारा प्रॉपोलीन गॅस टँकर उलटल्याने अद्यापही ज्वलनशील गॅस गळती रात्रीपर्यंत सुरूच होती. गॅस गळती बंद करण्यासाठी घटनास्थळी एक्सपर्ट बोलवण्यात आले. परंतु सध्या मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडीमुळे पोलिसांनी ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे एक्सपर्ट घटनास्थळापर्यंत पोहोचू शकले नाहीत. एक्सपर्ट टीम ही वाहतूक कोंडीत अडकली होती. त्यामुळे अपघातग्रस्त टँकर घटनास्थळावरच जसै थेच परिस्थितीत रात्री ९.३० वाजेपर्यंत तशीच होती. पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहनं लोणावळा येथून जुन्या मुंबई पुणे हायवेने मुंबईकडे वळवण्यात आली तर अवजड वाहने एक्सप्रेस वे वर थांबून ठेवण्यात आली.

advertisement

अग्निशमन दलाची गाड्या हजर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

अखेरीस आडोशी बोगद्याजवळ अपघात झालेल्या गॅस टँकरचे ज्वलनशील गॅस लिकेज थांबविण्यासाठी रात्री उशिरा एक्सपर्ट घटनास्थळी पोहोचणार आहे. एक्सपर्ट घटनास्थळी पोहोचले नसल्याने गॅस टँकरची गळती सुरू आहे, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे, अग्निशमक विभागाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलिसांकडूनही मोठी खबरदारी घेण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर स्फोटक परिस्थिती, वाहतूक ठप्प, 'त्या' टँकरचा VIDEO समोर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल