केबल ब्रिजमुळे 'डेडलाईन' लांबली
मिसिंग लिंक प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी १३० मीटर उंचीच्या केबल स्टेड ब्रिजवर स्लॅब टाकण्याचे काम अद्याप सुरू आहे. तांत्रिक अडचणींमुळे या पुलाचे काम उशिरा सुरू झाले, परिणामी डिसेंबर २०२५ ची डेडलाईन आता एप्रिल-मे २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आशिया खंडातील हा सर्वांत उंच दरीवरील पूल असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
काय होणार फायदा?
वेळेची बचत: या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई हे अंतर ६ किमीने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी वाचेल.
बोगद्यांचा थरार: प्रकल्पात १०.५ किमी लांबीचे दोन आशियातील सर्वांत रुंद बोगदे आहेत, ज्यांचे काम पूर्ण झाले आहे.
घाटातील कोंडीला पूर्णविराम: बोरघाटातील तीव्र वळणे आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ६ किमीच्या भागाला हा मार्ग पर्याय ठरेल.
कोंडीचे सावट कायम
नुकताच एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटल्याने सलग ३० तास वाहतूक ठप्प झाली होती. अशा परिस्थितीत 'मिसिंग लिंक'ची गरज तीव्रतेने भासत आहे. मात्र, जोपर्यंत हा ६५०० कोटींचा प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रवाशांना घाटातील अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडीचा सामना करावाच लागणार आहे.
