TRENDING:

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा तीच परिस्थिती! पहाटेपासून 5 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; महाकोंडी फोडण्यासाठी 'ब्लॉक'चा निर्णय

Last Updated:

पुणे लेनवर वाहनांच्या सुमारे ५ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या असून, खंडाळा घाट परिसरात वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटेपासून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पुणे लेनवर वाहनांच्या सुमारे ५ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या असून, खंडाळा घाट परिसरात वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पहाटे ५ वाजल्यापासून सुरू झालेली ही कोंडी अद्यापही कायम असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी
advertisement

कोंडीचे मुख्य कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, एक्सप्रेसवेवरील अमृतांजन ब्रिज ते आडोशी टनल (बोगदा) दरम्यान ही मोठी कोंडी झाली आहे. अवजड वाहने आणि ट्रक चालक घाट माथ्यावर चढताना 'लेन शिस्त' पाळत नसल्याने ही समस्या उद्भवली आहे. जड वाहने तिसऱ्या आणि चौथ्या लेनमधून जाण्याऐवजी ओव्हरटेकिंगच्या नादात सर्व लेन्स अडवून धरत आहेत, ज्यामुळे मागे येणाऱ्या हलक्या वाहनांचा वेग मंदावला आणि वाहनांची मोठी रांग लागली.

advertisement

Pune News: मोठा निर्णय! पुणेकरांनो, जुनी गाडी वापरताय? शहरात 7 लाख जुन्या वाहनांना बसणार 'ब्रेक'; बंदीची टांगती तलवार

१५ मिनिटांचा ब्लॉक

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आता पाऊल उचललं आहे. खोळंबलेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी १५ मिनिटांचा विशेष ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात काही वेळ वाहने थांबवून टप्प्याटप्प्याने मार्ग मोकळा केला जाणार आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महामार्ग पोलिसांची पथके घटनास्थळी तैनात असून अवजड वाहनांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजानमध्ये दिली जाते जकात, काय आहे या मागील प्रथा आणि महत्त्व? Video
सर्व पहा

पुण्याच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांनी शक्य असल्यास जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करावा किंवा परिस्थितीचा अंदाज घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा तीच परिस्थिती! पहाटेपासून 5 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; महाकोंडी फोडण्यासाठी 'ब्लॉक'चा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल