advertisement

Pune News: पाणी घेऊन चाललेली महिला; अचानक डोक्यात पडली सळई अन् जागीच मृत्यू, पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Last Updated:

लोखंडी जिन्याचे काम सुरू असताना क्रेनचा पट्टा अचानक तुटल्याने सळई डोक्यात पडून ही दुर्घटना घडली.

डोक्यात सळई पडून मृत्यू (प्रतिकात्मक फोटो)
डोक्यात सळई पडून मृत्यू (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : रामटेकडी औद्योगिक वसाहतीमध्ये एका भीषण अपघातात ४७ वर्षीय महिला कामगाराला आपला जीव गमवावा लागला आहे. लोखंडी जिन्याचे काम सुरू असताना क्रेनचा पट्टा अचानक तुटल्याने सळई डोक्यात पडून ही दुर्घटना घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी क्रेनचालक आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
वैशाली मारुती भोसले (रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे मृत महिलेचे नाव आहे. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास वैशाली आणि त्यांच्या सहकारी कंपनीच्या आवारातून पिण्याचे पाणी आणण्यासाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी कंपनीच्या मागील बाजूस लोखंडी जिना तयार करण्याचे काम सुरू होते. क्रेनचालक जड सळई उचलत असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटला आणि क्रेनने उचललेली लोखंडी सळई थेट वैशाली यांच्या डोक्यात पडली.
advertisement
ठेकेदाराचा निष्काळजीपणा नडला?
सळई पडल्याने वैशाली गंभीर जखमी झाल्या आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत असे समोर आले की, क्रेनचालक आणि ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्यामुळेच ही जीवघेणी दुर्घटना घडल्याचे उघड झाले आहे.
advertisement
वैशाली यांचा मुलगा चेतन भोसले याने दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलिसांनी क्रेनचालक, ठेकेदार आणि संबंधित जबाबदार व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पाणी घेऊन चाललेली महिला; अचानक डोक्यात पडली सळई अन् जागीच मृत्यू, पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement