TRENDING:

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवासाचा प्लॅन आज रद्दच करा; वाहतूक पूर्णपणे ठप्प, अनेक किलोमीटरच्या रांगा

Last Updated:

Mumbai-Pune Expressway: एक्सप्रेसवेवर वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. एक्सप्रेसवे बंद असल्यामुळे वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात आली आहे, मात्र तिथेही लोणावळ्यात प्रचंड भार आल्याने वाहने जागेवरच ठप्प आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सावध करणारी बातमी आहे. खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ केमिकल टँकर पलटी झाल्यामुळे झालेल्या गॅस गळतीमुळे एक्सप्रेसवेवरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. "आज एक्सप्रेसवेवरील प्रवास शक्यतो टाळावा," असे अधिकृत आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाकडून करण्यात आले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक ठप्प
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक ठप्प
advertisement

नेमकी घटना काय?

मंगळवारी (३ फेब्रुवारी २०२६) सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा एक ज्वालाग्रही गॅसचा (प्रोपोलिन) टँकर आडोशी बोगद्याजवळ पलटी झाला. या अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तात्काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद केली होती. मध्यरात्रीनंतर एका लेनवरून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न झाला़.

advertisement

वाहनांच्या लांबच लांब रांगा

या घटनेमुळे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. एक्सप्रेसवे बंद असल्यामुळे वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात आली आहे, मात्र तिथेही लोणावळ्यात प्रचंड भार आल्याने वाहने जागेवरच ठप्प आहेत. प्रवाशांना तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडावे लागत आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना:

जोपर्यंत गॅस गळती पूर्णपणे थांबत नाही आणि रस्ता सुरक्षित होत नाही, तोपर्यंत एक्सप्रेसवेवरून प्रवास करू नका. मुंबई किंवा पुण्याला जाणे अनिवार्य असल्यास रेल्वेचा पर्याय वापरावा किंवा जुन्या महामार्गावरील कोंडी लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. अग्निशमन दल आणि महामार्ग पोलीस गॅस गळती थांबवण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करत आहेत.

advertisement

महामार्ग पोलिसांचे आवाहन:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

"गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने कोणताही धोका पत्करता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत यंत्रणा 'क्लिअरन्स' देत नाही, तोपर्यंत एक्सप्रेसवे बंद राहील. प्रवाशांनी सहकार्य करावे आणि शक्य असल्यास आजचा प्रवास रद्द करावा," असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाकडून करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवासाचा प्लॅन आज रद्दच करा; वाहतूक पूर्णपणे ठप्प, अनेक किलोमीटरच्या रांगा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल