TRENDING:

मुंबई–पुणे प्रवास आता अवघ्या 48 मिनिटांत; अतिजलद ट्रेनबद्दल महत्त्वाची माहिती समोर

Last Updated:

या निर्णयामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार आणि व्यावसायिकांचा वेळ वाचणार असून, प्रवासाचा दर्जाही आंतरराष्ट्रीय स्तराचा होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर आता अधिक वेगाने कापले जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सात नवीन अतिजलद (High-Speed) ट्रेन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. या निर्णयामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार आणि व्यावसायिकांचा वेळ वाचणार असून, प्रवासाचा दर्जाही आंतरराष्ट्रीय स्तराचा होणार आहे.
पुणे मुंबई अतिजलद ट्रेन
पुणे मुंबई अतिजलद ट्रेन
advertisement

पुणेकरांसाठी प्रवासाची नवी क्रांती

सध्या सुरू असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या धर्तीवरच आता देशात सात नवीन हाय-स्पीड कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्यानुसार, पुणे हे या जाळ्यातील एक प्रमुख केंद्र असणार आहे.

मुंबई-पुणे मार्ग: या प्रकल्पामुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होईल.

पुणे-हैदराबाद मार्ग: पुण्याला दक्षिण भारताशी जोडणारा हा प्रकल्प व्यापार आणि पर्यटनाच्या दृष्टीने क्रांती घडवून आणेल.

advertisement

सात नवीन प्रकल्पांचे जाळे

केंद्र सरकारने 'नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड' (NHSRCL) च्या माध्यमातून खालील मार्गांवर काम करण्याचे नियोजन केले आहे: १. मुंबई ते पुणे २. पुणे ते हैदराबाद ३. हैदराबाद ते बंगळुरू ४. हैदराबाद ते चेन्नई ५. चेन्नई ते बंगळुरू ६. बंगळुरू ते वाराणसी ७. वाराणसी ते सिलीगुडी

advertisement

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची सद्यस्थिती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

मुंबई-अहमदाबाद या पहिल्या ५०८ किमीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. गुजरातमधील वापी ते साबरमती दरम्यानचा विभाग डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, तर मुंबईपर्यंतचा संपूर्ण मार्ग डिसेंबर २०२९ पर्यंत प्रवाशांसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे.

मराठी बातम्या/पुणे/
मुंबई–पुणे प्रवास आता अवघ्या 48 मिनिटांत; अतिजलद ट्रेनबद्दल महत्त्वाची माहिती समोर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल