TRENDING:

'माझी सासू लेडी डॉन, परिसरात त्यांची....' हिंदू धर्मात घरवापसी झालेली सायली सुर्वे रडली, 'त्या' कुटुंबाबद्दल सगळं सांगितलं

Last Updated:

"तर आपल्या चारही मुलांना हिंदू धर्मात परत आणल्याचं सांगतानाच, घरातील दोन जावांपैकी एका जावेने मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारला असून ती तिथेच राहत आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी चिंचवड: मिस इंडिया अर्थ स्पर्धेत सहभागी झालेली सायली सूर्वे हिने हिंदुधर्मामध्ये घरवापसी केल्याामुळे चर्चेत आली. शुद्धीकरण करून तिने हिंदू धर्मात प्रवेश केला. आता या तरुणीने आपल्यासोबत काय काय घडलं आणि सासूने कसा छळा केला होता, याचा पाढाच प्रसारमाध्यमांसमोर मांडला.  "माझी सासू लेडी डॉन आहे. तिचे सात भाऊ आहे. त्यांची परिसरात दहशत आहे, ती लोकं खोटे गुन्हे दाखल करून फसवण्याचं रॅकेट चालवतात, असे आरोपच केले आहे.
News18
News18
advertisement

पिंपरी चिंचवडमधील सायली सुर्वे नावाच्या तरुणीचे रविवारी शुद्धीकरण करून तिला हिंदू धर्मात पुन्हा घेण्यात आलं होतं. मीरा-भाईंदरमधील एका मुस्लिम बांधकाम व्यावसायकाशी तिने घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केलं होतं. मात्र, सासरचे मंडळी आपला छळ करत असल्याचा आरोप तिने केले होते. त्यानंतर सायलीच्या सासूने तिचे आरोप फेटाळले होते.  मात्र आज सायलीने पुन्हा एकदा माध्यमांसमोर येऊन तिच्या सासू आणि पतीबद्दल गंभीर आरोप केले आहे.

advertisement

"लग्नासाठी माझ्यावर बळजबरी झाली नसली तरी मला प्रेमामध्ये संमोहित करण्यात आलं होतं आणि त्या संमोहनामध्ये मी माझ्या मर्जीने लग्न केलं, तरीही हा एक लव्ह जिहादचाच प्रकार असल्यानं नुकत्याच हिंदू धर्मात घरवापसी केलेल्या सायली सुर्वे हिने स्पष्ट केलं आहे.

मुलांसाठी लढणार

"एवढंच नाहीतर लग्न झाल्यानंतर घरामध्ये हिंदू रिती रिवाजाने वागण्याचा प्रयत्न केला तर विरोध होत होता.लग्नानंतर काही दिवसातच मारहाण सुरू झाली मात्र मुलांसाठी अन्याय सहन केला पण शेवटी सहनशीलतेचा अंत झाला. मला आता भीती राहिली नाही पण माझे चार मुलं आहेत. त्यांच्यासाठी मी लढणार, मी खंबीर आहे, ती तडीपार असून देखील खुलेआम फिरते तिला राजकीय पाठबळ आहे ,हे थांबायला हवं' असं सायली म्हणाली.

advertisement

'माझी सासू लेडी डॉन'

"काही लोक मला ट्रोल करत आहे. काही जण घाण कमेंट करत आहे. पण मला फरक पडत नाही.  माझा त्या घराशी काही संबंध नाही. ते सेटलमेंट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण, माझा त्या घराशी संबंध नाही. माझी सासू लेडी डॉन आहे. तिची भावाची आसिफ पटेल, बिलाल पटेल, असे सात भाऊ आहे. त्यांच्यापैकी २ जणांचा काही वर्षांपूर्वी मर्डर झाला आहे. त्यांचे धंदे वेगवेगळे आहे. माझ्या सासूला काही राजकीय संघटनांचं पाठबळ आहे. तिच्यासोबत ज्या बायका राहतात, ज्या काम करतात, ती कोणतीही बाई उभी करते, छेड काढली म्हणून खोटे गुन्हे दाखल करतात. काही मुलं आहे, जे अंगावर वार झेलतात आणि गुन्हे दाखल करतात. मनोर मधला ३०७ कलमाखाली गुन्हा दाखल आहे' असा खुलासाही सायलीने केला.

advertisement

"तर आपल्या चारही मुलांना हिंदू धर्मात परत आणल्याचं सांगतानाच, घरातील दोन जावांपैकी एका जावेने मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारला असून ती तिथेच राहत आहे. तर तिसऱ्या क्रमांकाच्या सुनेवरही अत्याचार होत होता. मात्र तिला तिच्या नवऱ्याची साथ असल्याचं सायलीचं म्हणणं आहे. दरम्यान दहा वर्षात झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसात तक्रार केली असून आता भीती वाटत नाही मुलांसाठी मी खंबीरपणे उभा असल्याचं, सांगत सायली भावुक झाली.

advertisement

काय आहे प्रकरण? 

सायली सूर्वे असं या तरुणीचं नाव आहे. तिने २०१६ मध्ये घरच्यांचा विरोध झुगारून ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योगपती आतिफ तासे याच्यासोबत विवाह केला होता. लग्नानंतर तिने धर्म परिवर्तन केलं होतं. तिचं सायली नाव बदलून अलिझा नाव ठेवण्यात आलं होतं. तिने प्रेम विवाह केला असला तरी लग्नानंतर नवऱ्यासह तिच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ केल्याचा आरोप सायलीनं केलं आहे. 2016 मध्ये मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासे सोबत घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केलं होतं. मात्र आतिफशी लग्न करणं, आपली मोठी चूक होती, लग्न झाल्यानंतर सतत आपला छळ केला गेला आणि आपलं धर्मांतरण देखील केल्या गेल्याचा आरोप सायलीने केला होता. मागच्या दहा वर्षाच्या काळात आपल्याला चार मुलं झाली. त्यांच्या सुरक्षेसाठी आपण लग्नातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं.

शुद्धीकरण करून हिंदू धर्मात प्रवेश

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Youtube वर video पाहुन केली शेती, टरबूज-खरबुज प्रयोग यशस्वी,इतक्या लाखांचा नफा
सर्व पहा

या बाबत अनेकवेळा आपण पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं देखील सायली म्हणाली. अनेक प्रयत्न केल्यानंतर आपण हिदुत्वादी संघटनांच्या संपर्कात आलो. आता त्यांच्या मार्फतच आपल्याला हिंदुधर्मात प्रवेश केल्याचं सायलीनं सांगितलं. सायलीला परत हिंदू धर्मात घेण्यासाठी होम हवन मंत्रोच्चार करण्याची प्रक्रिया राबवली गेली. धक्कादायक बाब म्हणजे, ही प्रक्रिया बघण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी महापालिकेतील लहान विद्यार्थिनींना बोलवण्यात आलं होतं.

मराठी बातम्या/पुणे/
'माझी सासू लेडी डॉन, परिसरात त्यांची....' हिंदू धर्मात घरवापसी झालेली सायली सुर्वे रडली, 'त्या' कुटुंबाबद्दल सगळं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल