नेमकं काय घडलं?
राजेश चिमाजी वामन (वय ४५, रा. चऱ्होली बु.) यांचा कुंड्या विक्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपी ऋषिकेश विठ्ठल तापकीर (वय २५, रा. वडमुखवाडी) हा त्याच्या दोन साथीदारांसह कुंडी खरेदी करण्यासाठी वामन यांच्या दुकानात आला होता. कुंडीच्या किमतीवरून त्यांच्यात वाद झाला. आरोपींना कुंडी कमी दरात हवी होती, मात्र व्यापाऱ्याने नकार देताच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
advertisement
पोलिसांची रात्रीची गस्त; 24 वर्षाच्या प्रशांत रस्त्यावर दिसला उभा, जवळ जाताच मोठं कांड उघड
डोक्यात कुंडीने हल्ला
संतापलेल्या आरोपींनी राजेश वामन यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, दुकानातील एक जड कुंडी उचलून व्यापाऱ्याच्या डोक्यात घातली. या हल्ल्यात वामन यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
याप्रकरणी राजेश वामन यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी ऋषिकेश तापकीर आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्तरावर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र, किरकोळ वादातून झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
