TRENDING:

बसने अहिल्यानगरहून पुण्यात यायचा अन् दुचाकीनं परत जायचा; 40 वेळा उच्चशिक्षित तरुणाचं धक्कादायक कांड, अखेर CCTV मुळे उलगडा

Last Updated:

अटक करण्यात आलेल्या सराईत चोराचे नाव आश्पाक इसाक पठाण (वय ३२, रा. पाथर्डी, अहिल्यानगर) असून तो चक्क पदवीधर आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : अहिल्यानगर येथून चक्क बसने पुण्यात यायचे, एखादी दुचाकी चोरायची आणि त्याच गाडीवर स्वार होऊन पुन्हा नगरला परतायचे. अशा अजब पद्धतीने दुचाकींची चोरी करणाऱ्या एका सराईत आणि शिक्षित चोराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट २ ने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २१ लाख ६६ हजार रुपये किमतीच्या ४० दुचाकी जप्त केल्या असून, वाहनचोरीचे ३४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
दुचाकी चोराला अटक (प्रतिकात्मक फोटो)
दुचाकी चोराला अटक (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

शिक्षण पदवीधर, पण नाद चोरीचा

अटक करण्यात आलेल्या सराईत चोराचे नाव आश्पाक इसाक पठाण (वय ३२, रा. पाथर्डी, अहिल्यानगर) असून तो चक्क पदवीधर आहे. चोरीच्या दुचाकी विकत घेणारा त्याचा साथीदार मुकुंद उद्धवराव हारदास यालाही पोलिसांनी जेरबंद केले आहे. अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी या यशस्वी कारवाईची माहिती दिली.

Pune Crime: पुण्यात तरुणीनं आयुष्य संपवलं; 3 रूममेट्सनी पायलसोबत असं काय केलं? शेवटच्या नोटमध्ये धक्कादायक खुलासा

advertisement

बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांनंतर तपास पथकाने परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी बालेवाडी परिसरातून आश्पाक याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत चोरीचा हा मोठा आकडा समोर आला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
सर्व पहा

चोरलेल्या गाड्या तो आपल्या साथीदाराला स्वस्तात विकायचा. या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दुचाकी मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलीस आता या टोळीने अजून किती ठिकाणी डल्ला मारला आहे, याचा तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
बसने अहिल्यानगरहून पुण्यात यायचा अन् दुचाकीनं परत जायचा; 40 वेळा उच्चशिक्षित तरुणाचं धक्कादायक कांड, अखेर CCTV मुळे उलगडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल