हिंजवडी परिसरातील बदल (दुपारी ३ ते रात्री ११):
हिंजवडी गावठाण ते शिवाजी महाराज चौक या मार्गावर मिरवणूक निघणार असल्याने कस्तुरी चौक ते शिवाजी महाराज चौक हा रस्ता पूर्णपणे बंद असेल.
मारुंजी वाय जंक्शनकडून येणारी वाहने कस्तुरी चौक, विनोदे वस्ती आणि इंडियन ऑइल चौक मार्गे जातील.
मेझा २ चौकाकडून गावठाणकडे जाणारी वाहतूक इंडियन ऑइल चौक आणि कस्तुरी चौकामार्गे वळवण्यात आली आहे.
advertisement
मेझा २ चौकाकडून शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या दोन लेनपैकी डावी लेन बंद करण्यात आली असून, वाहतूक केवळ उजव्या लेनने सुरू राहील.
रहाटणी परिसरातील बदल (सायंकाळी ५ ते रात्री ११):
रहाटणी फाटा ते गोडांबे चौक: या मार्गावर जड वाहनांना पूर्णपणे बंदी असून, ही वाहने काळेवाडी फाटा मार्गे जातील.
गोडांबे चौक ते शिवाजी महाराज पुतळा (रहाटणी गाव): या मार्गावर सर्व वाहनांना बंदी असून, वाहतूक कोकणे चौकामार्गे वळवण्यात आली आहे.
महादेव मंदिर ते पुतळा चौक: हा मार्गही बंद असून वाहनचालकांनी पी. के. चौकाचा वापर करावा.
शिवजयंतीच्या उत्सवात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आयटी पार्क आणि परिसरातील नोकरदारांनी वेळेचे नियोजन करूनच प्रवासासाठी बाहेर पडावे.
