TRENDING:

सिद्धांतनं 'इमर्जन्सी अलर्ट'साठी सेव्ह केलेला मित्राचा नंबर; 10 वाजून 5 मिनिटांनी तो मेसेज आला अन् ठोका चुकला, पुण्यातील तिघांचा मृत्यू

Last Updated:

मृत सिद्धांत आल्हाट याच्या मोबाईलमध्ये 'इमर्जन्सी अलर्ट'साठी मित्र सार्थक तुपे याचा क्रमांक सेव्ह होता. बुधवारी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सार्थकला अचानक एक मेसेज आला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी : लेह-लडाखच्या स्वप्नवत सहलीचे रूपांतर एका भीषण शोकांतिकेत होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. राजस्थानमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील कुणाल चोरडिया, मयुरेश पाडाळे आणि सिद्धांत आल्हाट या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती ज्या पद्धतीने समोर आली, ती घटना सुन्न करणारी आहे.
अपघातात तिघांचा मृत्यू
अपघातात तिघांचा मृत्यू
advertisement

तंत्रज्ञानाने दिला मृत्यूचा सांगावा

मृत सिद्धांत आल्हाट याच्या मोबाईलमध्ये 'इमर्जन्सी अलर्ट'साठी मित्र सार्थक तुपे याचा क्रमांक सेव्ह होता. बुधवारी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सार्थकला अचानक एक मेसेज आला "सिद्धांतची कार क्रॅश झाली आहे." हा मेसेज पाहताच सार्थकच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने तातडीने दुसऱ्या कारमधील मित्रांशी संपर्क साधला. अवघ्या 15 मिनिटांत मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

advertisement

सोबत जाण्याचा होता आग्रह

"मित्रांनी मलाही सोबत येण्यासाठी खूप आग्रह केला होता, पण वैयक्तिक कारणांमुळे मी जाऊ शकलो नाही," असे सांगताना सार्थकचे डोळे पाणावले. तीन कारमधून हे सर्व मित्र पर्यटनासाठी गेले होते. दोन कार महामार्गावर थांबल्या असताना, पुढे गेलेल्या सिद्धांतच्या कारला काळाने गाठले.

या घटनेमुळे संपूर्ण शहरावर शोककळा पसरली असून, एका इमर्जन्सी मेसेजमुळे अपघाताची माहिती तातडीने मिळाली खरी, पण त्याने दिलेल्या जखमा कधीही न भरून येणाऱ्या आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

कुणाल चोरडिया (२५, रा. चिंचवडगाव), मयुरेश पाडाळे (२३, रा. म्हाळुंगे) आणि सिद्धांत आल्हाट (२१, रा. थेरगाव) अशी मृतांची नावे आहेत. २७ तारखेला हे तीन तरुण फॉर्च्यूनर कारमधून उत्तर भारताच्या सहलीवर गेले होते. परतीच्या प्रवासात राजस्थानमधील केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.

मराठी बातम्या/पुणे/
सिद्धांतनं 'इमर्जन्सी अलर्ट'साठी सेव्ह केलेला मित्राचा नंबर; 10 वाजून 5 मिनिटांनी तो मेसेज आला अन् ठोका चुकला, पुण्यातील तिघांचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल