पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समिती समोर अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये महापालिकेचे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 13 हजार 995 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले आहे. पुणे शहरातील वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक २०७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मलनिस्सारण प्रकल्पाला १२१६ कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी १३९० कोटी तर पथ विभागाला १८६६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
advertisement
पुणेकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका
पुणे शहरातील महत्त्वाचे रस्ते, वाहतूक कोंडी कमी करणे तर उड्डाणपूल, नदीवरील पूल, रेल्वे पुलांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहरातील पाच रस्त्यावर अँड पार्कचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पे अँड पार्क राबवले जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी पुणे शहरातील तीन पुलांचे काम पूर्ण होणार आहे. घोरपडी रेल्वे पूल, आगाखान नदीवरील पूल, सनसिटी कर्वेनगर नदीवरील पूल पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तसंच शास्त्रीनगर उड्डाणपूल, बिंदू माधव ठाकरे चौक उड्डाणपूल, सेनापती बापट चौक उड्डाणपूल येत्या दोन वर्षात पूर्ण होणार आहे. मेट्रो स्टेशनजवळ नागरिकांना पार्किंग व्यवस्था करण्यासाठी सुमारे ३० ठिकाणी aminity space उपलब्ध करून पार्किंग मिळणार
पुणे शहराचे विकास आराखड्यातील चार बोगदे पैकी पाषाण (पंचवटी) ते कोथरूड (सुतारदरा) व हिंगणे (खू) ते तळजाई चौक या दोन बोगदे यांचा विचार केला जाणार आहे.
अर्थसंकल्पामध्ये पुणेकरांना काय?
प्राथमिक शिक्षण विभागासाठी तब्बल ९७९ कोटी रुपयांची तरतूद
भवन रचना विभासाठी ६५० कोटी विद्युत विभाल २६५ कोटी रुपयांची तरतूद,
समाज विकासाला १४३.५० कोटी रुपयांची तरतूद
उद्यान विभागाला २०५ कोटी रुपयांची तरतूद
आरोग्य विभागासाठी ८८ कोटी रुपयांची तरतूद
नगर रचना नियोजनासाठी ६४.५० कोटी रुपयांची तरतूद
पर्यावरण विभागाला ५१.५९ कोटी रुपयांची तरतूद
माहिती व तंत्रज्ञान विभागाला ५६.७३ कोटी रुपयांची तरतूद
हेरिटेज सेलसाठी २८.५० कोटी रुपयांची तरतूद
पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाला १७१.३१ कोटी रुपयांची तरतूद
