काय आहेत नवीन बदल?
पीएमपीएमएल सध्या १३ विविध मार्गांवर पर्यटन बससेवा चालवते. यातील मार्ग क्र. ६ आणि ७ मध्ये आता ऐतिहासिक आणि ग्रामीण पर्यटनाचा संगम पाहायला मिळणार आहे.
सुधारित मार्ग आणि पर्यटन स्थळे:
मार्ग क्रमांक ६ (धार्मिक आणि ऐतिहासिक): पुणे स्टेशन - स्वारगेट - हडपसर - रामदरा - थेऊर गणपती - प्रयागधाम - दरेकर वाडा (यवत, ता. दौंड) - पुणे स्टेशन.(दरेकर वाड्याच्या समावेशामुळे पर्यटकांना अस्सल ग्रामीण वास्तुकलेचा अनुभव घेता येईल.)
advertisement
मार्ग क्रमांक ७ (ऐतिहासिक आणि निसर्गरम्य): पुणे स्टेशन - स्वारगेट - वाघोली - वाडे बोल्हाई - तुळापूर - वढू बुद्रुक - रांजणगाव (महागणपती) - मोराची चिंचोली - पाबळगाव (पदमणी जैन मंदिर आणि मस्तानी कबर) - कोरेगाव भीमा - पुणे स्टेशन.(मस्तानी कबर आणि मोराची चिंचोली हे या मार्गावरील मुख्य आकर्षण ठरणार आहेत.)
प्रवाशांसाठी महत्त्वाचे: 1. तिकीट दर: ५०० रुपये प्रति प्रवासी (प्रौढ). 2. सवलत: ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी २५० रुपये तिकीट. 3. वेळ: ही बससेवा शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी उपलब्ध असते. 4. सुविधा: वातानुकूलित (Electric AC) बसद्वारे हा सुखद प्रवास घडवला जातो.
कमी खर्चात 'पुणे दर्शन': खाजगी वाहनांनी या सर्व स्थळांना भेट देणे खर्चिक आणि कष्टाचे ठरते. मात्र, पीएमपीच्या या नियोजित सेवेमुळे सामान्यांना एकाच दिवसात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन घेणे शक्य झाले आहे. ऐतिहासिक महत्त्वाची मस्तानी कबर आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले मोराची चिंचोली ही नवी स्थळे पर्यटकांना नक्कीच आकर्षित करतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
