TRENDING:

बारामती हादरली! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 10 वर्ष जेलमध्ये पण परत येताच नराधमाचं चिमुरडीसोबत हादरवणारं कांड

Last Updated:

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे, या आरोपीने २००९ मध्ये एका १३ वर्षीय मुलीवर अशाच प्रकारे अत्याचार केला होता. त्या गुन्ह्यात त्याला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली होती

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : बारामतीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यात चॉकलेटचे आमिष दाखवून एका अल्पवयीन बालिकेवर शेजाऱ्यानेच अत्याचार केला. बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. ओळखीचा गैरफायदा घेऊन या ५२ वर्षीय नराधमाने हे अमानवीय कृत्य केले. पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल करताच आरोपी शहर सोडून पळण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याला एसटी स्टँड परिसरातून जेरबंद केले.
नराधमाचं चिमुरडीसोबत हादरवणारं कांड (प्रतिकात्मक फोटो)
नराधमाचं चिमुरडीसोबत हादरवणारं कांड (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

शिक्षा भोगली पण मनोवृत्ती बदलली नाही

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे, या आरोपीने २००९ मध्ये एका १३ वर्षीय मुलीवर अशाच प्रकारे अत्याचार केला होता. त्या गुन्ह्यात त्याला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरही या नराधमाच्या विकृत मनोवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. त्याने पुन्हा एका १० वर्षांच्या बालिकेला आपल्या जाळ्यात ओढले.

advertisement

आरोपीने बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरात नेले आणि तिथे तिच्याशी अश्लील कृत्य केले. इतकेच नव्हे तर, कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने चिमुरडीला दिली होती. मात्र, पीडितेच्या कुटुंबाने हिंमत दाखवत पोलीस स्टेशन गाठले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा माग काढला. सध्या या आरोपीची येरवडा केंद्रीय कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. "महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस कटिबद्ध असून अशा विकृत गुन्हेगारांविरुद्ध 'झिरो टॉलरन्स' नीती अवलंबली जाईल," असे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
बारामती हादरली! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 10 वर्ष जेलमध्ये पण परत येताच नराधमाचं चिमुरडीसोबत हादरवणारं कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल