पुणे: राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. अशातच पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. कोंढवा परिसरात एका घरावर पोलिसांनी छापा मारला. यावेळी छाप्यात कपाटातून तब्बल १ कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. अवैध दारूवर कारवाई करताना पोलिसांच्या हाती हे घबाड लागलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात काकडे वस्ती गल्ली नंबर 2, मध्ये पोलिसांनी प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत एका घरावर छापा टाकला. या ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याच्या माहितीच्या आधारावर ही कारवाई केली होती. यावेळी बंद कपाटात मोठी रक्कम सापडली. या घरातून देशी दारूच्या विक्रीचा व्यवसाय सुरू होता.
advertisement
घरातून सुरू असलेल्या व्यवसायातून घबाड सापडले आहे. कपाटातून १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम इतकी मोठी होती की, पोलिसांना नोटा मोजताना बराच वेळ लागला होता. या कारवाईत पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतलं आहे.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठा दारूचा साठा जप्त केला.
1. 50 एम एल चे 80 फुगे - 1600 रुपये
2. 35 मीटरचे दोन कॅन एकूण 70 लिटर - 28000
3. नंबर 1 व्हिस्की 220 नग -48,400
4. आयबी व्हिस्की 183 नग -40,260
5. आर एस 180 ml 224 नग - 56,000
6. आर एस 90 ml 20 नग - 2,800
7. क्लासिक गोल्ड 32 नग - 4,800
8. Volkan ब्लू ३८ नग - 6,080
9. डर्बी स्पेशल 43 नग - 6,880
10. ओल्ड मंक रम 48 नग - 10,320
11. टँगो पंच 77 नग -6,160
असा दारूचा साठा जप्त केला आहे. तर 2,05,900 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. या कारवाईत दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे. ऐन नाताळ आणि थर्टी फस्टच्या आधी मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
