TRENDING:

मेट्रो आली, पण वीज नेली! हजारो रहिवाशांनी अंधारात काढले 24 तास, आयटीयन्स मेट्रोवर संतापले; हिंजवडीत काय घडलं?

Last Updated:

हा खंडित झालेला वीजपुरवठा मंगळवारी दुपारपर्यंत पूर्ववत झाला नव्हता. मेट्रो स्टेशनच्या कामासाठी सुरू असलेल्या बेजबाबदार खोदकामामुळे मुख्य वीज वाहिन्या म्हणजेच केबल्स तुटल्याने हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : हिंजवडी आयटी पार्क फेज दोनमधील यशवीन सोसायटीमध्ये सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. मात्र हा खंडित झालेला वीजपुरवठा मंगळवारी दुपारपर्यंत पूर्ववत झाला नव्हता. यामुळे सोसायटीतील हजारो नागरिकांना शारीरिक त्रासासोबतच मोठा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागला आहे.
हिंजवडी आयटी पार्क फेज दोनमधील यशवीन सोसायटीमध्ये वीजपुरवठा खंडित (प्रतिकात्मक फोटो)
हिंजवडी आयटी पार्क फेज दोनमधील यशवीन सोसायटीमध्ये वीजपुरवठा खंडित (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

ज्येष्ठ नागरिक आणि आयटीयन्सचे हाल

वीज नसल्यामुळे इमारतीमधील लिफ्टही बंद पडल्या. परिणामी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना वरच्या मजल्यांवर ये-जा करणे अशक्य झाले. 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांचे काम ठप्प झाल्याने त्यांना मानसिक मनस्ताप सहन करावा लागला. यासोबतच उन्हाळ्याचे दिवस असल्याने २४ तास आणि रात्रभर विजेविना राहिल्याने घरातील दूध, अन्नपदार्थ आणि भाज्या खराब झाल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. मेट्रो स्टेशनच्या कामासाठी सुरू असलेल्या बेजबाबदार खोदकामामुळे मुख्य वीज वाहिन्या म्हणजेच केबल्स तुटल्याने हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

advertisement

४० हजारांचा आर्थिक भुर्दंड

सोसायटीचा बॅटरी बॅकअप संपल्यानंतर, लिफ्ट आणि कॉमन एरियातील दिवे सुरू ठेवण्यासाठी जनरेटरचा आधार घ्यावा लागला. यासाठी तब्बल ४०० लिटर डिझेल जळाले, ज्याचा खर्च अंदाजे ४० हजार रुपयांच्या घरात गेला असल्याचं सांगितलं जात आहे. "मेट्रोच्या चुकीमुळे आम्हाला हा आर्थिक भुर्दंड का सोसावा लागतोय?" असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

advertisement

मेट्रो आणि महावितरणविरोधात संताप

मंगळवारी सकाळी यशवीन सोसायटीच्या रहिवाशांनी प्रवेशद्वारावर एकत्र येत मेट्रो प्रशासन आणि महावितरण विरोधात जोरदार निदर्शने केली. मेट्रोच्या कामामुळे वारंवार वीज वाहिन्या तुटत असूनही अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

"मेट्रो स्टेशनसाठी सुरू असलेल्या खोदकामात केबल्स तुटल्या होत्या. खूप खोलवर काँक्रीट आणि दगड खाली या केबल्स अडकल्याने दुरुस्तीला वेळ लागला. मेट्रोच्या कामाचा यापूर्वीही अनेकदा फटका बसला आहे." — एन. बी. येनगे, सहायक अभियंता, महावितरण, हिंजवडी विभाग.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
मेट्रो आली, पण वीज नेली! हजारो रहिवाशांनी अंधारात काढले 24 तास, आयटीयन्स मेट्रोवर संतापले; हिंजवडीत काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल