मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा मागील दोन वर्षांपासून मित्र आहेत. या दोघांमध्ये मागील दोन वर्षांपासून शारीरिक संबंध होते. आरोपीने अनेकदा मुलीला एका महिलेच्या घरी घेऊन जात तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. रविवारी संबंधित मुलीची प्रकृती अचानक बिघडली. ती चक्कर येऊन खाली पडली.
मुलीला बरं वाटत नसल्याने मुलीच्या आईने तिला रुग्णालयात दाखल केलं. यावेळी तिची वैद्यकीय तपासणी केली असता, ती आठ महिन्यांची गरोदर असल्याचं निष्पन्न झालं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मुलावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 26, 2025 2:00 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
15 वर्षांच्या मुलाकडून 14 वर्षांची मुलगी 8 महिन्यांची गरोदर; पुण्यातील धक्कादायक प्रकार
