विमानतळ प्रशासनाचे आवाहन: शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. सायकल शर्यतीचा मार्ग आणि त्यावरील गर्दीमुळे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचे विमान चुकू नये, यासाठी त्यांना नेहमीपेक्षा किमान १ ते २ तास आधी घरून निघण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
पर्यायी मार्गांचा वापर करा: शहरातील मुख्य रस्ते सायकलिंगसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांनी बाहेर पडण्यापूर्वी पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांची आणि बंद रस्त्यांची सविस्तर माहिती घ्यावी. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रवाशांनी गुगल मॅप्स किंवा पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे विमानतळ संचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर विशेषतः विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता आणि संगमवाडी परिसरातील वाहतुकीवर लक्ष ठेवून प्रवासाचे नियोजन करणे प्रवाशांच्या हिताचे ठरेल.
स्पर्धेचा मार्ग (Route):
राधा चौक (बाणेर) → पूनम बेकरी (सूस रस्ता) → पाषाण सर्कल → पुणे विद्यापीठ चौक → राजीव गांधी पूल → सेनापती बापट जंक्शन → सेनापती बापट रस्ता (बालभारती) → पत्रकार भवन → लॉ कॉलेज रस्ता → शेलार मामा चौक → कर्वे पुतळा चौक → वनाज → पौड रस्ता → नळस्टॉप → म्हात्रे पूल → सेनादत्त पोलीस चौकी → टिळक चौक → पुरम चौक → अप्पा बळवंत चौक → राष्ट्रभूषण चौक → सावरकर चौक → महाराष्ट्र मित्र मंडळ चौक → सेवन लव्हज चौक → पॉवर हाऊस चौक → डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक → इंदिरा गांधी चौक → अर्जुन रस्ता → घोरपडी जंक्शन → बोलहाई चौक → लाल महाल चौक → स. गो. बर्वे चौक → नरवीर तानाजी वाडी चौक → गरवारे चौक → बालगंधर्व चौक.
