नेमकं काय घडलं?
सोमवारी फिर्यादी अमोल चौधर हे भारत चौधर, सागर चौधर, आदित्य चौधर, सुनील चौधर व इतरांसह नवरात्रोत्सव सुरू असल्याने देवीची ज्योत राशीन येथून वंजारवाडी येथे दत्त मंदिरासमोर घेऊन आले. मंदिरासमोर पुजा करून पारंपरिक वाद्यावर उत्सव साजरा करीत असतानाच रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एक चारचाकी त्या ठिकाणी आली. या गाडीतून सात जण ओळखीचे, तर अज्ञात दोघं हातात कोयता, चाकू अशी हत्यारं घेऊन उतरले अन् हल्ला केला.
advertisement
वंजारवाडी येथील दत्त मंदिरासमोर आरोपींनी चौधर यांना पाहिल्यानंतर शस्त्र काढली अन् सपासप वार केले. या हल्ल्यात फिर्यादीसह अनेकजण जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील तपास करीत आहेत.
हृतिक ऊर्फ गुड्या मुळीक, ओम अर्जुन कुचेकर, अली मुजावर, दीपक भोलनकर, रवी माने, शुभम वाघ आणि तेजस हजारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यातील शुभम वाघ, अली मुजावर आणि ओम कुचेकर या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात अण्णा चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात सुनील गोरख चौधर, अमोल आण्णा चौधर, भारत गोकुळ चौधर, सागर चंद्रकांत चौधर आणि आदित्य सर्जेराव चौधर हे 5 जण जखमी झाले आहेत. पाचही जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलंय.