TRENDING:

17 वर्षांची ओळख, खरातला पैसे कमवण्याचा 'तो' मार्ग दाखवणारा भक्तचा कसा बनला काळ? धक्कादायक पुणे कनेक्शन समोर

Last Updated:

सुमारे १५-१७ वर्षांपूर्वी नर्मदा परिक्रमेदरम्यान खरातची ओळख पुण्यातील एका भक्ताशी झाली होती. या भक्तानेच खरातला जमिनीच्या व्यवहारातून 'सोन्यासारखा' पैसा कमावण्याचा मार्ग दाखवला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने अंकशास्त्राच्या नावाखाली भविष्य सांगून आणि जमिनीचे व्यवहार यांचा अजब मेळ बसवत अफाट संपत्ती कमावणाऱ्या खरातच्या कारनाम्यांचे आता 'पुणे कनेक्शन' उघड झाले आहे. ज्या भक्तांनी खरातला श्रीमंतीचा रस्ता दाखवला, त्यांनीच आता त्याचे काळे चिट्ठे बाहेर काढण्याचा विडा उचलल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
अशोक खरात प्रकरणाचं पुणे कनेक्शन
अशोक खरात प्रकरणाचं पुणे कनेक्शन
advertisement

नर्मदा परिक्रमा ते जमिनीचे व्यवहार

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १५-१७ वर्षांपूर्वी नर्मदा परिक्रमेदरम्यान खरातची ओळख पुण्यातील एका भक्ताशी झाली होती. या भक्तानेच खरातला जमिनीच्या व्यवहारातून 'सोन्यासारखा' पैसा कमावण्याचा मार्ग दाखवला. इतकेच नव्हे, तर मोठ्या जमिनी खरेदी करण्यासाठी लागणारे तगडे भागीदारही याच पुणेकर भक्ताने मिळवून दिले. या भागीदारीतून खरातने अल्पावधीतच भरपूर पैसा आणि संपत्ती जमा केली.

advertisement

वाटा नाकारला अन् संबंध ताणले

संपत्तीची हाव वाढलेल्या खरातने पुढे जाऊन आपल्याच मार्गदर्शक भक्तांना बाजूला सारले. मिळालेल्या अफाट नफ्यातील वाटा पुण्यातील भक्ताला आणि मुंबईतील एका दुसऱ्या भक्तालाही मिळाला नाही. या आर्थिक फसवणुकीतून त्यांच्यातील संबंध विकोपाला गेले. ज्यांनी खरातला उभे केले, त्यांनीच आता त्याचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा चंग बांधला असून, त्याचे कारनामे बाहेर काढण्यात त्यांना यश येत असल्याची चर्चा आहे.

advertisement

पुण्यातील हा संबंधित शहरातील एकदम पॉश भागात राहातो. दरम्यान आगामी काळात खरातचे आणखी कोणते 'कारनामे' चव्हाट्यावर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोपी खरातचं कांड

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भारतीय स्वातंत्र्यासाठी इथं व्हायच्या बैठका, पुण्यातील ऐतिहासिक राम मंदिर, तुम्ही पाहिलंय का? Video
सर्व पहा

आरोपी विधी करण्याच्या बहाण्याने महिलांना गुंगीचं औषध द्यायचा. यानंतर तो त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. तसेच तसेच तो दुर्मिळ खडे, गंडे, दोरे देऊन कोट्यवधींची फसवणूक करायचा. तसेच तो स्वत:ला मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन असल्याचा दावाही करायचा. पण त्याचे हे सगळे दावे खोटे असल्याचं समोर आलं आहे. तो लहानपणापासूनच घोटाळेबाज असून त्याने स्वत:चं नाव देखील लपवल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
17 वर्षांची ओळख, खरातला पैसे कमवण्याचा 'तो' मार्ग दाखवणारा भक्तचा कसा बनला काळ? धक्कादायक पुणे कनेक्शन समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल