भांडणाचा राग मनात धरून हत्या
दांडिया खेळताना झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी ही मारहाण केली होती. घटनेनंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हल्ला झालेल्या मुलाला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात नेलं, त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले. याप्रकरणी आता कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
advertisement
पुण्यात गुन्हेगारीचा धुमाकूळ
बाजीराव रस्ता परिसरात व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडील १ लाख ३० हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना घडली. याबाबत चंद्रकांत छाडवा खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघा दुचाकीस्वार चोरट्यंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिकाचे सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्ता परिसरात इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली १ लाख ३० हजारांची रोकड चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेली.