वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
आयुष कोमकरवर आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. वडील गणेश कोमकर पाच वाजता पुण्यात पोहोचणार आहे. नागपूरच्या जेलमधून त्याला पुण्याला विमानाने आणण्यात आलं आहे. आयुषच्या हत्येनंतर आता वैकुंठ स्मशानभूमीत त्याच्यावर चार दिवसानंतर अंत्यसंस्कार होणार आहेत. आयुषचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी लावली फिल्डिंग
advertisement
आयुषच्या अंत्यसंस्कारात कोणताही मोठा राडा होवू नये, यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा अंत्यसंस्कारावेळी असणार आहे. पोलिसांनी या प्रकरणात मोठी खबरदारी घेतली असून कोणतीही चूक होणार नाही, याची खात्री पोलिसांनी घेतली आहे.
पोलिसांना अंदाजच नव्हता
दरम्यान, वादातून स्वतःच्या नातवाची किंवा बहिणीच्या मुलाची हत्या केली जाईल असा अंदाज पोलिसांना नव्हता, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहेत. आता गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी त्यांच्यावर कारवाई करणार. कोणत्याच गँगला आणि गँगस्टरच्या चुकीला माफी नाही, असा इशारा देखील अमितेश कुमार यांनी दिला आहे. त्यामुळे आता पोलीस आणखी मोठी चूक होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.