मला न्याय द्यायचा नसेल तर...
सर्वपक्षीय नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे. मला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण करू नका. आंदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका. कारण त्यांनी माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. सत्तेची ताकद त्यांच्याकडे होती, त्यामुळे ते आज इतक्या थराला पोहोचले, असं म्हणत आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकरने आंदेकर टोळीचं सिक्रेट उघड केलं.
advertisement
कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेन
प्लिज असं नका करू. आंदेकर टोळीला तिकीट देऊ नका. मी विनंती करते. जो पक्ष त्यांना तिकीट देईल, त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेन. माझ्या मुलाला न्याय द्या, मला एवढंच पाहिजे, असं म्हणत कल्याणी कोमकरने व्हिडीओ शेअर केला आहे. आंदेकर टोळीला तिकीट दिलं तर ते सत्तेचा वापर करून पुन्हा गुन्हेगारीतून डोकं वर काढतील, असं कल्याणीला म्हणायचं आहे.
बंदू आंदेकरला कायद्याचं चांगलं ज्ञान
दरम्यान, बंदू आंदेकरला कायद्याचं चांगलं ज्ञान आहे. त्याचा कायद्यातील तुटी माहिती असल्याने त्याने निवडणूक लढवण्यासाठी अर्ज केला अन् जेलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतू आता कल्याणीने आपल्याच बापाविरुद्ध शड्डू ठोकला असून बंडूला जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न केला जातोय. अशातच आता पुण्याच्या राजकारणात देखील याची चर्चा होताना दिसतीये.
