TRENDING:

पुण्यात होणार होती हत्या; पोलिसांनी दांडेकर पूल परिसरात रचला सापळा, चेतन आला पण... चौकातच थरार

Last Updated:

दांडेकर पूल येथील मांगीरबाबा चौक परिसरात आरोपी चेतन जाधव संशयास्पदरित्या वावरत असताना पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहरात टोळीयुद्धातून रक्ताचा सडा सांडण्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. एका सराईत गुन्हेगाराचा काटा काढण्यासाठी रचलेला खुनाचा कट पोलिसांनी अत्यंत कुशलतेने उधळून लावला असून, याप्रकरणी सराईत गुन्हेगार चेतन ऊर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव (२६) याला बेड्या ठोकल्या आहेत.
हत्येचा डाव उधळला (AI Image)
हत्येचा डाव उधळला (AI Image)
advertisement

टोळीयुद्धाची ठिणगी आणि खुनाचा कट

या प्रकरणाची पाळेमुळे ऑक्टोबर २०२४ मधील एका हल्ल्यात आहेत. पर्वती परिसरात संतोष ऊर्फ भावड्या साळुंखे याच्यावर शस्त्राने हल्ला झाला होता. या गुन्ह्यात गणेश रेणुसे याच्यासह अन्य आरोपींवर 'मकोका'अंतर्गत कारवाई झाली होती. अलीकडेच गणेश रेणुसे जामिनावर बाहेर आला. आपल्यावर पुन्हा हल्ला होईल, या भीतीने रेणुसेच्या नातेवाईकांनी साळुंखे याचा गेम करण्याचा 'आधीच' कट रचला. यासाठी त्यांनी गावठी पिस्तूल खरेदी केले आणि चेतन जाधव याच्याकडे हल्ल्याची जबाबदारी सोपवली.

advertisement

पोलिसांनी 'असा' उधळला कट

या खुनाच्या कटाची कुणकुण पोलीस अंमलदार सचिन माळवे आणि अमर पवार यांना लागली. माहिती मिळताच खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. दांडेकर पूल येथील मांगीरबाबा चौक परिसरात आरोपी चेतन जाधव संशयास्पदरित्या वावरत असताना पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. वेळेत माहिती मिळाल्याने संभाव्य हत्याकांड टळले आहे.

advertisement

कारवाईचा बडगा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय भाजीपाला- फळे खरेदी करताय? खरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

आरोपी जाधव याला अटक करून त्याच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख आणि पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे दत्तवाडी आणि पर्वती परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात होणार होती हत्या; पोलिसांनी दांडेकर पूल परिसरात रचला सापळा, चेतन आला पण... चौकातच थरार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल