कृष्णा आंदेकर प्रमुख 'लिंक'
कृष्णा हा मारेकरी आणि कट रचणाऱ्या आरोपींमधील प्रमुख 'लिंक' असल्याचा दावाही तपास अधिकाऱ्यांनी केल्याने सध्या खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कृष्णाने दिले असल्याची कबुली अमन पठाण व सुजल मेरगू यांनी दिली आहे. कृष्णाने पिस्तूल कोठून आणलं, फरारी असताना तो कोणाच्या संपर्कात होता आदी मुद्द्यांवर तपास करायचा आहे.
advertisement
विलास पठारे यांची मागणी
आरोपीच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती मिळवायची आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी द्यावी,' अशी मागणी सहायक आयुक्त शंकर खटके व विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केली. यावेळी त्यांनी अधिकचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी मागितली होती, कोर्टाने ही मागणी मान्य देखील केली आहे.
आरोपी स्वतःहून हजर झाला
दरम्यान, गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूल आधीच जप्त करण्यात आलं आहे. आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला असून, तपास यंत्रणेला सहकार्य करत आहे. त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नाही,' असा युक्तिवाद आरोपीचे वकील अॅड. मनोज माने यांनी केला होता. त्यानंतर कोर्टाने 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.