पुण्यातले कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्रातले कुख्यात गुन्हेगार हे येरवाडा कारागृहात ठेवले जातात. त्यांना वैद्यकीय तक्रारी असतील तर त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार केले जातात. पण या सुविधेचा गुन्हेगार आणि ससून रूग्णालयाच प्रशासन मिळून गैरवापर करत असल्याच आढळून आलं आहे. सध्याच्या घडीला कारागृहात 9 कुख्यात गुन्हेगार आहेत. त्यांचा कारागृहातला मुक्काम वाढतोस कसा असा प्रश्न आहे. सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल 274 दिवस या वॅार्डमध्ये मटकाकिंग विरल सावलाचा मुक्काम आहे. कोल्हापूरचा मटका किंग सलीम मुल्ला याच्यावर कोल्हापूर पोलिसानी मोक्का अंतर्गत कारवाईत केली होती. या गुन्हात विरल सहआरोपी आहे.
advertisement
ससून रूग्णालयात कोणते गुन्हेगार आहेत?
विरल सावला
अनिल भोसले
प्रवीण राऊत
हरिदास साठे
रूपेश मारणे
आदित्य मारणे
शिवाजी दोरगे
विनय आरान्हा
हेमंत पाटील
वाचा - कारागृहाने चारवेळा सांगूनही ललित पाटीलला आश्रय, ससून रुग्णालय संशयाच्या भोवऱ्यात
ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातील दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्यानंतर ससून रुग्णालयात पाहुणचार घेणाऱ्या कैद्यांची यादी आता समोर आली आहे. या कैद्यांना जास्त काळ रूगाणालयात निर्धोक राहता यावं म्हणून ससून रूग्णालय प्रशासनाचे प्रमुखच प्रयत्न करत असल्याच समोर आलं. फरार आरोपी ललित पाटील सापडल्यानंतर त्याची खातीरदारी करणाऱ्या कुणालाच सोडणार नसल्याच पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता असलेले संजीव ठाकूर हे मात्र या प्रकरणानंतर दोन दिवसापासून माध्यमांपासून पळ काढताहेत. ललित पाटील याच्यावर तेच उपचार करत असल्याचंही समोर आलंय. हे सगळं प्रकरण तापल्यानंतर आता ससून रूग्णालय प्रशासन मूग गिळून गप्प आहे. पण फार काळ ही परिस्थिती राहणार नाही, असं चित्र आहे. कारण, पुणे पोलिसांनी याप्रकरणात कुणालाच सुट्टी मिळणार नसल्याच स्पष्ट केलं आहे.
