या भीषण दुर्घटनेत ३८ वर्षीय पवन राजहंस काळे, त्यांचे मेहुणे ३८ वर्षीय बाळासाहेब नागवडे आणि पवन यांची ९ वर्षांची चिमुकली मुलगी आराध्या पवन काळे या तिघांचा जागीच करुण अंत झाला. मध्यरात्रीच्या शांततेत झालेल्या या अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. कार आणि ट्रकची धडक इतकी जोरात होती की मृतदेह बाहेर काढताना उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.
advertisement
या अपघातात कुटुंबातील एक सदस्य गंभीर जखमी झाला असून, त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. निमोणे गावातील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा असा अचानक मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातामुळे शिरूर-न्हावरे रस्त्यावरील सुरक्षेचा आणि जड वाहनांच्या वेगाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.
