'बेलबॉटम' हॉटेलमध्ये राडा
समोर आलेल्या माहितीनुसार, हिंजवडी जुना जकात नाका परिसरातील 'बेलबॉटम' हॉटेलमध्ये ही घटना घडली. वाद पेटल्यानंतर 5 ते 6 जणांनी अजिंक्य विनोदे यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे अजिंक्य विनोदे यांचा जीव वाचला. अजिंक्य विनोदे हे चिंचवड येथील जयहिंद बँकेचे संचालक आहेत. तसेच ते वाकड भागात अजिंक्य विनोदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम पाहतात.
advertisement
विविध कलमांखाली गुन्हा दाखल
आरोपींमध्ये सुमित सदाशिव, विकी तीपाले, अथर्व शिंदे, गौतम कांबळे, बंटी ठाकरे आणि समाधान यांची नावे समोर आली आहेत. यातील काही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तडीपारची कारवाई देखील झाली असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 109, 189, 191 सह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.
याला जिवंत सोडायचं नाही...
दरम्यान, अजिंक्य यांचे वडील धनाजी विनोदे हे जयहिंद बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम पाहतात. मॅनेजरकडे हॉटेलचे थकीत भाडे मागितल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने अजिंक्य विनोदे या तरुणावर खुनी हल्ला केला. दुसरा आरोपी गौतम कांबळे याने शिवीगाळ करीत आज याला जिवंत सोडायचे नाही, असे म्हणूत आपल्या जवळील चाकूने वार केले. आरोपी अथर्व शिंदे याने काटेरी चमच्याने डोक्यात वार केल्याची माहिती समोर आली आहे.