पोलिसांना काय काय मिळालं?
आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू अदिकर याच्या घरावर गुन्हे शाखेने छापा टाकला. आंदेकरच्या घरातून 77 तोळे सोन्याचे दागिने चांदी, अडीच लाखांची रोकड, मोटार, करारनामे, कर पावत्या असा कोट्यवधींचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आंदेकरने केलेल्या जमीन व्यवहाराच्या इसार पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत. आयुष कोमकर खून प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.
advertisement
16 मोबाइल संच, दागिन्यांच्या पावत्या अन्...
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या वृंदावनी, स्वराज आणि तुषार यांच्या घरातून 21 हजारांची रोख रक्कम, 16 मोबाइल संच, दागिन्यांच्या पावत्या, एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अदिकर यांच्या घरातून 77 तोळे सोन्याचे दागिने, अडीच लाखांची रोकड, दहाहून अधिक साठेखत, कुलमुख्यारपत्र, बँक पुस्तिका, विविध करारनामे जप्त करण्यात आले.
25 हून जास्त सीसीटीव्ही कॅमेरे
आंदेकरने वैयक्तिक सुरक्षेसाठी घराच्या परिसरात 25 हून जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या प्रकरणात पसार असलेल्या पाच आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीला मदत करणाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.