नेमकी घटना काय?
मूळचा बिहारचा असलेला १९ वर्षीय फिर्यादी तरुण आपल्या मित्रासह पुणे रेल्वे स्थानकावर उतरला होता. तिथून गुरुवारी (२२ जानेवारी) हे दोन्ही तरुण रिक्षाने आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. रिक्षा बंडगार्डन रस्ता परिसरात आली असता, मेट्रो स्थानकाजवळ रिक्षाचालकाने अचानक रिक्षा थांबवली.
धमकावून ऐवज लांबवला: रिक्षा थांबताच चालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी दोन्ही तरुणांना घेरलं. त्यांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील साडेतीन हजार रुपयांची रोकड आणि महागडा मोबाईल असा एकूण २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला. लूटमार केल्यानंतर आरोपी रिक्षासह पसार झाले.
advertisement
Pune Crime: फेसबुकवर ओळख अन् प्रेमही झालं; पुढे पुण्यातील तरुणीसोबत नको ते घडलं, पोलिसात धाव
धक्क्यातून सावरल्यानंतर तरुणाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मेट्रो स्थानक आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. रेल्वे स्थानकावरून रिक्षात बसताना प्रवाशांनी रिक्षाचा नंबर आणि चालकाची माहिती तपासावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
फेसबुक फ्रेंडकडून फसवणूक
सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीवर किंवा प्रेमावर विश्वास ठेवणं किती घातक ठरू शकतं, याचा प्रत्यय देणारी आणखी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात फेसबुकवरील मैत्री आणि प्रेमसंबंधांच्या जाळ्यात ओढून एका तरुणीला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आला आहे. लग्नाचे आणि घरगुती अडचणींचे खोटे कारण सांगून एका तरुणाने तरुणीची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
