TRENDING:

Pune Crime: पतीच्या निधनानंतर महिलेनं 'जीन्स' घातली; चिडलेल्या सासू आणि दिराने केलं असं कांड की पुणे हादरलं

Last Updated:

महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर तिची मोठी मुलगी तिथे आली. मात्र आईला वाचवण्याऐवजी तिनेही मारहाण करण्यास सुरुवात केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील सहकारनगर परिसरातून वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. पतीच्या निधनानंतर विधवा महिलेने 'जीन्स' घातली या कारणावरून तिच्याच सासूने, दिराने आणि खुद्द जन्मदात्या मुलीने तिला अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात पीडित महिलेचा हात मोडला असून परिसरात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जीन्स घातल्यानं मारहाण (AI Image)
जीन्स घातल्यानं मारहाण (AI Image)
advertisement

नेमका प्रकार काय?

तळजाई वसाहत परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ही महिला कचरावेचक म्हणून काम करून आपल्या चार मुलांचा सांभाळ करते. ३० डिसेंबरच्या सायंकाळी ही महिला जीन्स घालून घराबाहेर उभी असताना, तिच्या सासूने (सविता) तिथे येऊन केवळ कपड्यांच्या कारणावरून तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सासूने सुनेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचे केस ओढून मारहाण केली.

advertisement

महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर तिची मोठी मुलगी तिथे आली. मात्र आईला वाचवण्याऐवजी तिनेही मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी पीडितेच्या दिराने तिचा डावा हात जोरात पिरगळला, ज्यामुळे तिच्या मनगटाचे हाड मोडले. इतक्यावरच न थांबता आरोपींनी पीडितेच्या लहान मुलांनाही धक्काबुक्की केली आणि महिलेचा मोबाईल हिसकावून घेतला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळद खातीये चांगलाच भाव, शेवगा आणि डाळींबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीत तिच्या हाताला 'फ्रॅक्चर' असल्याचे निष्पन्न झाले आहे. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी सासू, दीर आणि मुलीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गंभीर दुखापत आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पतीच्या निधनानंतर महिलेनं 'जीन्स' घातली; चिडलेल्या सासू आणि दिराने केलं असं कांड की पुणे हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल