TRENDING:

22 दिवस, अश्लील व्हिडीओ अन् तो एक कॉल..; पुण्यातील वृद्ध जोडप्यानं लेक अन् जावयापासूनही लपवलं ते कांड, शेवटी भयंकर घडलं

Last Updated:

"ही सुप्रीम कोर्टाची अत्यंत गोपनीय केस आहे, तुम्ही कोणाशीही बोललात तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल," अशी धमकी दिल्याने हे वृद्ध पती-पत्नी प्रचंड घाबरले

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील एरंडवणे परिसरात राहणाऱ्या एका ७० वर्षीय ज्येष्ठाला आणि त्यांच्या पत्नीला सायबर गुन्हेगारांनी चक्क २२ दिवस दहशतीखाली ठेवलं. यानंतर त्यांना २ कोटी १ लाख रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुप्रीम कोर्टाची केस असल्याचे सांगून आणि अटकेची भीती दाखवून भामट्यांनी या दाम्पत्याची आयुष्यभराची पुंजी लंपास केली.
वृद्ध जोडप्याची फसवणूक (AI Image)
वृद्ध जोडप्याची फसवणूक (AI Image)
advertisement

असा रचला 'भयपट'

१३ जानेवारी रोजी फिर्यादींना एक फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण 'पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऑफ इंडिया'मधून राहुल रॉय बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या आधार कार्डचा वापर करून मनी लाँड्रिंग झाले असून, अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पाठवले जात आहेत, अशी भीती त्यांना दाखवण्यात आली. इतकेच नाही तर तुमचे नाव 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (PFI) सारख्या प्रतिबंधित संघटनेशी जोडले गेले असून दीड कोटींचा फ्रॉड झाला आहे, असा खोटा दावा करण्यात आला.

advertisement

कोणालाही सांगायचं नाही!

"ही सुप्रीम कोर्टाची अत्यंत गोपनीय केस आहे, तुम्ही कोणाशीही बोललात तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल," अशी धमकी दिल्याने हे वृद्ध पती-पत्नी प्रचंड घाबरले. दहशतीमुळे त्यांनी पुण्यात राहणारी स्वतःची मुलगी आणि जावई यांनाही काहीही सांगितले नाही.

२२ दिवसांत २ कोटी लंपास

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

४ फेब्रुवारीपर्यंत चाललेल्या या प्रकारात चोरट्यांनी विविध बँक खात्यांवर एकूण २ कोटी १ लाख ९० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. खात्यातील सर्व पैसे संपल्यानंतर जेव्हा आपली फसवणूक झाल्याचे या दाम्पत्याला उमजले, तेव्हा त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक देवकाते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
22 दिवस, अश्लील व्हिडीओ अन् तो एक कॉल..; पुण्यातील वृद्ध जोडप्यानं लेक अन् जावयापासूनही लपवलं ते कांड, शेवटी भयंकर घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल