१८ डिसेंबर रोजी सायबर चोरट्यांनी फिर्यादी महिलेला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फोन केला. "तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून विविध राज्यांत बँक खाती उघडली आहेत आणि त्यातून मनी लाँड्रिंगचे व्यवहार झाले आहेत," अशी भीती त्यांना घालण्यात आली. महिलेला तासनतास व्हिडिओ कॉलवर गुंतवून तिला 'डिजिटल अरेस्ट' केल्याचा बनाव रचण्यात आला. अटक टाळायची असेल, तर तपासासाठी पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेकडून वेळोवेळी एकूण ४ कोटी ८२ लाख १४ हजार रुपये विविध बँक खात्यांत वर्ग करून घेतले.
advertisement
30 वर्ष सहन केला पत्नीचा छळ; पण शेवटी विवाहबाह्य संबंध समजले अन्.., पुण्यातील पतीचं मोठं पाऊल
इतकी मोठी रक्कम दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले आणि त्यांनी १९ जानेवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सध्या पोलीस तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. "कोणतीही तपास यंत्रणा किंवा पोलीस फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर कोणालाही अटक (डिजिटल अरेस्ट) करत नाहीत. पैशांची मागणी केल्यास तो सायबर गुन्हा समजावा आणि तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा," असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
