कोणत्या किल्ल्यांवर निर्बंध?
जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंहगड, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर आणि राजमाची यांसारख्या किल्ल्यांचा यात समावेश आहे. या ठिकाणी ३१ डिसेंबरच्या संध्याकाळपासूनच पर्यटकांना खाली उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः सिंहगडावर संध्याकाळी ५ वाजल्यानंतर वर जाणाऱ्या गाड्या रोखल्या जातील आणि रात्री गडावर कोणालाही थांबता येणार नाही.
वन विभागाची कडक भूमिका:
advertisement
निसर्गाच्या सानिध्यात नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या बहाण्याने अनेक पर्यटक जंगल क्षेत्रात मद्यपान करणे, डीजेचा गोंगाट करणे किंवा प्लास्टिक कचरा फेकणे असे प्रकार करतात. यामुळे वन्यप्राण्यांना त्रास होतो आणि जंगलात वणवा पेटण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी वन विभागाने मुळशी, ताम्हिणी, लोणावळा आणि भोर परिसरातील संरक्षित वनक्षेत्रांत गस्त वाढवली आहे.
वाहनांची तपासणी आणि गस्त:
सिंहगड पायथ्याला असलेल्या टोलनाक्यावर प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाणार आहे. गडावर मद्य किंवा मांस नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या मोहिमेत वन विभागासोबत स्थानिक 'संयुक्त वन व्यवस्थापन समित्या' आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.
