प्रवाशांनो जरा जपून! ट्रेनमधून उतरताना चिरडले गेले दोन्ही पाय, 18 वर्षीय तरुणासोबत घडली भयंकर दुर्घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे-सातारा डेमो रेल्वेतून उतरताना एका १८ वर्षीय तरुणाचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना नीरा रेल्वे स्थानकावर घडली आहे
पुणे : पुणे-सातारा डेमो रेल्वेतून उतरताना एका १८ वर्षीय तरुणाचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना नीरा रेल्वे स्थानकावर घडली आहे. या अपघातात तरुणाचे दोन्ही पाय चिरडले गेले असून, रेल्वे प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेमुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
अपघाताचा थरार आणि प्रशासनाची उदासीनता: मिळालेल्या माहितीनुसार, सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील आदित्य साहेबराव होळकर हा तरुण सोमवारी संध्याकाळी नीरा रेल्वे स्थानकात उतरत होता. यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो थेट रुळाखाली गेला. या भीषण दुर्घटनेत त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. अपघात झाल्यानंतर मदतीसाठी रेल्वे पोलीस, आरपीएफ किंवा स्टेशन कर्मचारी तत्काळ पुढे आले नाहीत, असा गंभीर आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रेल्वे स्थानकातील पोलीस मदत केंद्रालाही कुलूप असल्याचे यावेळी दिसून आले.
advertisement
प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याचे पाहून स्थानिक तरुणांनी पुढाकार घेतला. प्रहार संघटनेच्या रुग्णवाहिकेतून जखमी आदित्यला तातडीने लोणंद आणि त्यानंतर जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या तरुणावर उपचार सुरू आहेत.
advertisement
रेल्वे अपघाताच्या वेळी मदत कशी मिळवावी?
view commentsकोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत १३९ (139) या एकाच क्रमांकावर संपर्क साधा. हा क्रमांक सुरक्षा, वैद्यकीय मदत आणि तक्रारींसाठी २४x७ उपलब्ध असतो. रेल्वेचे अधिकृत 'रेल्वे मदत' ॲप वापरून तुम्ही तातडीने मदतीची मागणी करू शकता. यात तुमचे लोकेशन आपोआप ट्रॅक केले जाते. स्थानकावर सुरक्षा रक्षक उपलब्ध नसल्यास १३९ वर कॉल केल्यास जवळच्या मोठ्या स्थानकावरील पथकाला तातडीने पाचारण केले जाते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
प्रवाशांनो जरा जपून! ट्रेनमधून उतरताना चिरडले गेले दोन्ही पाय, 18 वर्षीय तरुणासोबत घडली भयंकर दुर्घटना









